Home भद्रावती क्राईम डायरी :- भद्रावती पोलीसांनी देशी विदेशी दारूसह तब्बल २१,९३,००० रु चा...

क्राईम डायरी :- भद्रावती पोलीसांनी देशी विदेशी दारूसह तब्बल २१,९३,००० रु चा पकडला मुद्देमाल.

 

मुख्य मार्गावर लावलेले बैरिकेट तोडून पळालेल्या वाहनाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडून केली अटक.

भद्रावती प्रतिनिधी :-

मूखबिर च्या माहितीनुसार दिनांक १३.०६.२०२१ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला बातमी मिळाली की, एक पांढ-या रंगाची मारूती डिझायर गाडी जामवरून चंद्रपुरकडे भद्रावती मार्ग अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करीत आहे व त्यास एक पांढ-या रंगाची क्रेटा गाडी पायलटींग करीत आहे. अशा खबरेवरून भद्रावती टप्पा येथे नाकेबंदी केली असता पायलटींग करीता असलेले वाहन के एम एच २७ बी झेड ९९९८ मिळुन आली त्यास विचारपुस करीत असतांना एक मारुती डिझायर ही गाडी एम एच ४९ बी ३८२८ वेगाने भद्रावती टप्पा येथुन पडोली च्या दिशेने निघाली त्याचा पाठलाग केला असता सदर गाडी यू टर्न मारून भद्रावती कडे आली व नाकेबंदीतील बॅरीकेट उडवुन वरोरा दिशेने निघाली असता वरोरा येथील नाकेबंदीचे बॅरीकेट सुद्धा उडवीले. त्या गाडीचा पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला असता ती गाडी जीएमआर कंपनीचे जवळ मिळून आल्यान त्याची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात मागील सिटवर ४० खडर्याचे बॉक्समध्ये प्रत्येकी ९० एम. एल. मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूने भरलेल्या सिलबंद ४००० निपा कि.अं. ४,००,००० रु, दोन खर्डाचे बॉक्समध्ये प्रत्येकी १८० एमएल मापाच्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की च्या ९६ सिलबंद निपा कि अ २८,८०० रु तीन खडर्याचे बॉक्समध्ये प्रत्येकी १८० एमएल मापाच्या मॅकडॉल नं १ सिझव्ह व्हिस्की ओरीजनलच्या सिलबंद १४४ निपा कि अ ४३,२०० रु, वाहतुकीस वापरलेली मारुती डिझायर क एम एच ४९ बी ३८२८ कि अ ७,००,०००रू, तसेच पायलटिंग करीता असलेले केटा वाहन क एम एच २७ बी झेड ९९९८ कि अ १०,००,००० रू व ३ मोबाईल कि अ २१,०००रू असा एकुण २१,९३,००० रु चा माल आसीफ मेहबुब शेख, वय २६ वर्षे, जात मुस्लीम रा. फुलफैल, वर्धा आमीन इब्राहिम शेख वय २८ वर्षे जात मुस्लीम, रा. वैशाली नगर, वर्धा, गौरव चंद्रशेखर घसाळ, वय २२ वर्षे जात गवळी रा. आंजी, वर्धा ता जि वर्धा, जसीम रहिम कुरेशी, वय २४ वर्षे जात मुस्लीम रा. फुलफैल, वर्धा यांचेकडुन 8 ताब्यात घेतला.

तसेच काही इसम वर्धा नदी वरून ढोरवासा मार्गे भद्रावती कडे अवैधरित्या देशी दारू घेवुन येत आहे. अशा बातमीवरून ढोरवासा चौकी जवळ तीन इसम एका मोसावर त्याचे मधात पांढरी चुंगळी घेवुन येतांना दिसले. त्यास थांबवून त्यांचे नांव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नांव अमर लेडांगे, विष्णु मिटपल्लीवार, महेश गलांडे, रा गवराळा भद्रावती असे सांगीतलेवरून त्याचे जवळील चुंगळीची पाहणी केली असता त्यात प्रत्येकी ९० एम एल मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या ३०० सिलबंद निपा कि अ ३०,००० व वाहतुकीस वापरलेली मोसा क एम एच ३४ जी ७६८९ कि अ ३०,००० रु असा एकूण ६०,००० रु चा माल जप्त केला.

सदरची कार्यवाही मा अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि. पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार, गुन्हे शो पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार, पोशि केशव चिटगिरे, पोशि एकनाथ राठोड, हेमराज प्रधान, शशांक बदामवार पो खावती पोना/ गणेश पोश / प्रदिप मडावी, पोशि/ गोपिनाथ नरोले व पोशि/ विनोद जाधव, स्थागुशा, चंद्रपुर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here