Home महाराष्ट्र ” साहेबा प्राण तळमळला” राजसाहेबांच्या भेटीसाठी आसुसलेल्या महाराष्ट्र सैनिकांची व्यथा!

” साहेबा प्राण तळमळला” राजसाहेबांच्या भेटीसाठी आसुसलेल्या महाराष्ट्र सैनिकांची व्यथा!

 

सुदामा-कृष्णप्रेमाचा दाखला देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडली महाराष्ट्र सैनिकांची तगमग.

राजधर्म वार्ता :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारे व तेवढीच निष्ठा ठेवणारे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना स्वतः व महाराष्ट्र सैनिक भेटू शकत नाही कारण साहेबांनी अगोदरच तसा आदेश दिला आहे त्यामुळे आपली व्यथा व आपली राजसाहेबांप्रती भावना फेसबुक च्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली ती महाराष्ट्र सैनिकांची जणू भावना व्यक्त करणारी ठरली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “सुदामाचे राजधन”असे शीर्षक देऊन आपली भावना व्यक्त केली ते म्हणतात की “सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजूनही देत असतात. सुदामाकडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे “राजधन”. योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा “कृष्णकुंज”च आहे. या लॉक डाउन मुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे…
” साहेबा प्राण तळमळला”
पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू.”

शेवटी लिहितांना बाळा नांदगावकर यांनी राजसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना म्हटले की “आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन
“तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए” “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here