मागील २० वर्षापासून भटकत असलेल्या महिलेला मिळाला हक्काचा निवारा. वरोरा मनसेचा अनोखा उपक्रम.
वरोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या दिनांक १४ जून या वाढदिवशी प्रत्त्येक वर्षाला वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, दरवर्षी महाराष्ट्रातून मनसे कार्यकर्ते मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मोठी गर्दी करतात यावर्षी मात्र कोरोना च्या संकट काळात महाराष्ट्र सैनिकांनी मला शुभेच्छा द्यायला मुंबई येथे कृष्णकुंजवर येऊ नये तर स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची व परिसरातील जनतेची काळजी घेऊन त्यांना मदत करा तोच माझा खरा वाढदिवस असेल असे आवाहन राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना केले होते.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला दाद देत वरोरा तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवून एका शंकुतला नावाच्या तब्बल २० वर्षापासून उघड्यावर आपले वास्तव करणाऱ्या महिलेला तिचे ऊन, वारा, पाऊस यापासून सरक्षण व्हावे यासाठी तिला मनसे निवारा तयार करून दिला,या सामाजिक उपक्रमाची वरोरा शहरात चांगलीच चर्चा असून राजकारणातून समाजकारण जर केले तर अनेकांना मदत होऊ शकते आणि त्यापासून इतर राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाल्यानंतर नवी पिढीला सामाजिक जाणीव होऊ शकते.
तब्बल २० वर्षापासून एकाच जागेत आपला उघड्यावर संसार करणाऱ्या शकुंतला या महिलेला कुणीही आजपर्यंत मदत करून तिला राहण्यासाठी छत दिल नव्ह्तं पण त्या महिलेच्या त्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मनसे पदाधिकारी यांनी त्या महिलेला मनसे निवारा तयार करून देऊन एक नवा उपक्रम राबविला, मनसेच्या या उपक्रमात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, तालुका अध्यक्ष वैभव डहाने.तालुका सचिव प्रशांत बदकी, शहर उपाध्यक्ष कल्पक ढोरे प्रणय परिमल, कुणाल गौरकार व इतर महाराष्ट्र सैनिक सहभागी होते.