Home भद्रावती भद्रावती पोलिसांची पुन्हा एक मोठी कामगिरी देशी विदेशी दारूच्या पेट्यासह १०,७०,००० रू...

भद्रावती पोलिसांची पुन्हा एक मोठी कामगिरी देशी विदेशी दारूच्या पेट्यासह १०,७०,००० रू चा मुद्देमाल जप्त.

 

सलग दोन दिवस अवैध दारू साठा पकडल्याने दारू माफियांचे धाबे दणाणले.

भद्रावती जावेद शेख :-

भद्रावती पोलीसानी सलग १३ जून नंतर १४ जून ला सुद्धा अवैध दारू च्या पेट्या सह मुद्देमाल आरोपी कडून जप्त केल्याने या परिसरात अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १४.०६.२०२१ ला सुद्धा रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की, एक पांढ-या रंगाची मारुती डिझायर गाडी एम एम ३० ओ झेड २२६४ वणी वरून भद्रावती मार्गे चंद्रपुरकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणार आहे. अशा खबरेवरून मौजा घोडपेठ येथे दुपारी १५.०० वा दरम्यान नाकाबंदी केली असता चालकाने त्याचे वाहन दुरवर उभे करून चालक व एक इसम पळुन गेले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव व पत्ता विचारला असता चालकाने त्याचे नांव अजय राजेंद्र राम, वय २४ वर्षे, व बाजुला बसलेल्या इसमाने त्याचे नांव अंकीत विलास खंडारे, वय २६ वर्षे रा. दोन्ही रा. रा.न्यु माजरी, शांती कॉलनी, माजरी असे सांगीतले वरून मारुती डिझायर क एम एम ३० ओ झेड २२६४ वाहनाची पंचासमक्ष प्रो व्ही बाबत झडती घेतली असता त्यात मागील सिटवर २५ खडर्याच बॉक्समध्ये प्रत्येकी ९० एम.एल. मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारूने भरलेल्या सिलबंद २५०० निपा कि.अं. २,५०,०००रू, व वाहतुकीकरीता वापरलेले वाहन मारुती डिझायर क एम एम ३०ओ झेड २२६४ जिचा चेसीस क MA3CZF03SHM239496 व इंजीन क D12A-3201677 कि.अ.८,००,०००रू व दोन मोबाईल कि अ २०,०००रू असा एकण १०,७०,००० रू चा माल जप्त केला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि.पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार पोशि केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

Previous articleमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसे नेते नांदगावकर यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन.
Next articleस्तुत्य उपक्रम :-मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी उघड्यावर असलेल्या महिलेला दिला निवारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here