Home महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसे नेते नांदगावकर यांचे महाराष्ट्र सैनिकांना...

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसे नेते नांदगावकर यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन.

 

तीन महाराष्ट्र सैनिकांची हत्त्या व अपघाताने जीव गमवावा लागला त्यांच्या दुःखी परिवाराला सढळ हाताने मदत करा.

राजधर्म :-

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा महाराष्ट्र सैनिकांना मोठा उत्सव वाटतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक दरवर्षी १४ जून ला कृष्णकुंज वर गर्दी करतात पण कोरोना चे संकट बघता राजसाहेब ठाकरे यांनी यावर्षी आपल्या घरीच राहून आपल्या परिवाराची व आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांची काळजी घ्या व त्यांना मदत करा यातच माझा वाढदिवस साजरा झाल्याच समाधान मला होईल असे आवाहन महाराष्ट्र सैनिकांना केले होते.

राजसाहेबांच्या या आवाहना नंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केले ते म्हणतात की
“चांगले कर्म हाच राजधर्म”असतो आणि आज माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आहे.हा दिवस आपणा सर्वांसाठी कोणत्याही सणा पेक्षा मोठा दिवस असतो, राजसाहेबांनी आपणा सर्वांना ओळख, नाव सर्व काही दिले. आज आपण सर्व मिळून साहेबांना या वाढदिवशी त्यांना सर्वात मोठा आनंद देणारी गोष्ट करूयात.

राजसाहेबांचा सर्वात मोठा आनंद हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात आहे. आणि कार्यकर्त्यांच दुःख साहेबांना सहन होत नाही. मागील वर्षात आपल्या 3 कार्यकर्त्यांना हत्या व अपघाता मुळे जीव गमवावा लागला. तिन्ही जण अतिशय तरूण वयात गेले. स्वतः साहेबांनी व मी सुद्धा या तिन्ही परिवाराशी संपर्क साधून आधार देण्याचा प्रयत्न केला. ह्या तिघांचा समान धागा म्हणजे त्यांचे साहेबांवर असणारे अतोनात प्रेम व श्रद्धा. त्यामुळे आज साहेबांच्या वाढदिवशी आपणा सर्वांना विनंती करतो की आपल्या ह्या सहकाऱ्यांना आपण पुढे येऊन मदत करु यात. कर्ता पुरुष गेल्याचे दुःख हे आर्थिक मदतीने भरून येणार नाही, परंतु या आर्थिक मदतीने ह्या तिन्ही परिवारा ला मोठी मदत होईल हे निश्चित.
आज पर्यंत साहेबांनी आपणास चांगले कर्म हाच खरा “राजधर्म” हि शिकवण दिली आहे व त्यालाच अनुसरून आज आपण आपले कर्तव्य करू यात.

आपले 3 सहकारी खालीलप्रमाणे

1) राकेश पाटील
2) जमिल शेख
3) नितीन मोरे

सोबत फोटो मध्ये या तिघांच्या परिवारातील सदस्यांचे “AC NO” व बँक डिटेल चा एक फोटो जोडत आहे. तसेच मी ऑनलाइन मदत दिल्याचा फोटो जोडत आहे, यात आपणास कोणताही मोठेपणा नको, उद्दिष्ट एकच कि सगळ्यांनी प्रेरणा घेऊन या तिघांच्या परिवाराला मोठी आर्थिक मदत करू या. तुमची अगदी 100 रुपये प्रत्येकी हि मदत सुद्धा मोलाची ठरेल. त्यामुळे सर्वांनी यथाशक्ती मदत करावी.

हि मदत करताना आपण एक लक्षात ठेवा कि या तिघांनाही आपणास सम समान मदत करायची आहे. उदा- तुम्हाला 300 रुपये मदत करायची असल्यास प्रत्येकाच्या खात्यात 100 रुपये प्रत्येकी द्यावी. हि मदत करताना सर्वांनीच सढळ हस्ते करावी हि नम्र विनंती. तसेच आपण केलेली मदत चा स्क्रीन शॉट काढून तो कंमेंट्स मध्ये शेयर करा व या 91672 73447 या मोबाईल वर WTS APP करा कारण आपण केलेली मदत बरोबर पोहचली का हे या द्वारे कळेल.

नेता हा कार्यकर्त्यां मुळे व कार्यकर्त्यां मधूनच घडत असतो. आजच्या कार्यकर्त्यांमधूनच उद्याचा नेता घडत असतो. फक्त निवडणुकीपूरते कार्यकर्ता ला गृहीत न धरता त्याच्या सुख दुःखात सर्वच पक्षीय नेत्यांनी तसेच सहकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही खरच काळाची गरज आहे.

Previous articleधक्कादायक :- कोरोनातून सुटका झाल्यानंतर दृष्टी जाण्याचा धोका?
Next articleभद्रावती पोलिसांची पुन्हा एक मोठी कामगिरी देशी विदेशी दारूच्या पेट्यासह १०,७०,००० रू चा मुद्देमाल जप्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here