Home चंद्रपूर लज्जास्पद :- सीटीपीएस कंपनीतील सहाय्यक अभियंता आपल्या पत्नीसह दोन वर्षीय मुलीला घरी...

लज्जास्पद :- सीटीपीएस कंपनीतील सहाय्यक अभियंता आपल्या पत्नीसह दोन वर्षीय मुलीला घरी ठेऊन फरार?

 

दूर्गापूर पोलिसांकडे मिसिंग रिपोर्ट, अभियंता मिळाला पोलीस स्टेशन मधे मात्र पुन्हा झाला गायब?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पती पत्नीच्या भांडणात पत्नी पतीला सोडून पळून गेली किंव्हा रागाने माहेरी गेली असे प्रकरण आपण ऐकले असेल पण नवरा आपल्या बायको व मुलांना सोडून ते सुद्धा सरकारी नौकरी असतांना व सरकारी घरात राहताना सोडून जाणे म्हणजे हे प्रकरण जगावेगळे आहे असेच म्हणावे लागेल पण हो ही खरी गोष्ट आहे,चंद्रपूर ऊर्जानगर म्हणजे सीटीपीएस कंपनीतील वसाहतीत राहणाऱ्या एका सहाय्यक अभियंत्यांने चक्क आपल्या बायकोसह आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घरात सोडून व त्यांच्या खाण्यपिण्याची व्यवस्था न करता घरातून पलायन केले असल्याची लज्जास्पद बाब उघड झाली आहे.

सहाय्यक अभियंता हा दिनांक ९ जून ला पत्नींसोबत भांडण करून घरातून निघून गेला तो आलाच नाही त्यामुळे दिनांक १० जूनला दूर्गापूर पोलीस स्टेशन मधे त्यांच्या पत्नीने तक्रार केली व पोलिसांनी ती मिसींग ची केस म्हणून पोलीस रेकॉर्डवर घेतली व तपास सुरू केला मात्र दिनांक १६ ला सहाय्यक अभियंता हे दूर्गापूर पोलीस स्टेशन मधे अचानक प्रकटले व पत्नीला बोलावण्यात आले. मात्र ठाणेदार धुळे यांनी त्या फरार झालेल्या आरोपी पतीस काही गोष्टी सांगून त्यांना घरी पाठविण्याची गरज असतांना त्यांनी उलट त्या पीडित पत्नीलाच दोषी ठरवून तिच्या अब्रूचे धिंडवडे उडवले. त्यामुळे आता आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून सामाजिक माध्यमावर समाजसेवी लोकांशी पत्नीने संपर्क केला आणि आपली व्यथा मांडली.त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आणि त्यांनी पत्नीचे बयान ऐकून जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्रात केस दाखल करण्याची शिफारस केली.त्यामुळे दूर्गापूर पोलीस स्टेशन मधे पत्नीवर आलेला दबाव हा कमी झाला.दरम्यान अजूनही तो सहाय्यक अभियंता फरार आहे.

खरं तर जो पती महिन्याला लाखांच्या वर पगार कमावतो तो आपल्या पत्नीला ३० रुपये द्यायचे की नाही म्हणून आपल्या आईला विचारतो व पत्नीसोबत विनाकारण भांडण करून तू आत्महत्या कर म्हणून तिच्यावर दबाव आणतो एवढेच नव्हे तर आत्महत्या कशी करायची याची आयडिया तो पत्नीला देतो म्हणजे हा सहाय्यक अभियंता किती निष्ठूर व धूर्त आहे हे कळून येते पण त्याच्यापेक्षा धूर्त ते पोलीस निरीक्षक आहे जे घरातून पळून जाणाऱ्या सहाय्यक अभियंत्यांची पाठराखण करून पीडित पत्नीला दोषी मानतात व पळकुट्या पतीला सोडून देतात. मात्र आता हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्रात गेल्याने व सीटीपीएस कंपनीच्या मुख्य अभियंत्यांकडे सुद्धा ही तक्रार गेल्याने आरोपी सहाय्यक अभियंता यांचे तीनतेरा वाजायला उशीर लागणार नाही असे संकेत मिळत आहे.आता तो सहाय्यक अभियंता कोण? याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here