Home चंद्रपूर क्राईम डायरी :- स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला तब्बल ३०...

क्राईम डायरी :- स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा पकडला.

 

सुमठाना जंगलात टाकलेल्या छाप्यात वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेत्रूत्वात परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा राजुरा तालुक्यातील सुमठाना जंगलातून पकडला असून वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यापूर्वी याच परिसरात दोन त कारवाया करण्यात आल्या. त्यात पहिल्या कारवाईत ७४ किलो तर च दुसऱ्या कारवाईत ८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुन्हा तेलंगणा राज्यातून गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. या माहितीवरून खाडे यांनी एएसआय केमेकर, गणेश भोयर, विनोद, प्रमोद, गोपीनाथ यांचे विशेष पथक तयार करून गांजा तस्करांवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले. हे पथक मागील चार दिवसांपासून सुमठाना जंगलात त ठाण मांडून होते.

गुरुवारी सकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. यावेळी या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. तेव्हा दुचाकी वाहनावरील दोन चुंगड्यात गांजा आढळून आला. तसेच चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी अन्य दोघे आरोपी १० किलो गांजा घेऊन पसार झाले. पोलिसांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानंतर खाडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचासमोर गांजाचे वजन केले असता सुमारे ९० किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. याची अंदाजे किंमत ३० लाख आहे. सर्व गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली वाहने जप्त केली.

अटक करण्यात आलेल्या चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर न वाल्मिक पाझारे यांच्या विरोधात राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार दोघांचा शोध सुरू आहे. हा गांजा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर न आणि वरोरा शहरात वितरित केला – जाणार होता, अशी माहिती अटकेतील व्यक्तींनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here