Home भद्रावती धक्कादायक :- वेबसाईटच्या नावावर आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील संचालकांनी लावला...

धक्कादायक :- वेबसाईटच्या नावावर आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील संचालकांनी लावला लाखोंचा चुना?

 

10 ते 20 हजारांची वेबसाईट किंमत असतांना तब्बल 657000/- रुपयाचे कोटेशनची रक्कम देऊन सभासदांची फसवणूक?

भ्रष्ट संचालक समिती भाग-9

मागील अनेक महिन्यापासून आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत लाखों रूपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार काही संचालक सभासदांनी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक व लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडे पुराव्यांसह दिली होती व त्या अनुषंगाने चौकशी केली असता ५७ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले होते.पण तरी सुद्धा तत्कालीन तालुका सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक यांनी भ्रष्ट संचालकांवर कारवाई केली नाही, त्यामुळे रवी माढळकर यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात येथील पत संस्थेचे सभासद यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती व रवी माढळकर यांच्या लेखा परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपील क्रमांक ७६/२०२० वर दिनांक २/३/२०२१ ला काढला. पण त्यानंतर सुद्धा संचालकांवर कारवाई झाली नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

जवळपास 57 लाखांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संचालकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना आता पुन्हा एक नवा कारणामा आयुध निर्मानी चांदा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी करून 10 ते 20 हजाराची वेबसाईट च्या किमतीला तब्बल 657000 रुपयाची ठरवून 6 लाखांच्या वर भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकार कायद्या अंतर्गत समोर आली असून या प्रकरणात संचालकांवर फौजदारी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात या पतसंस्थेचे अगोदरच प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आता हे लाखो रुपयाचे प्रकरण त्यात सामील झाले आहे त्यामुळे दोषी संचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

.

Previous articleव्यक्तीविशेष:- व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांनी तब्बल पंधरा हजारांवर आजतागायत काढली कार्टून्स व रेखाचित्रे
Next articleक्राईम डायरी :- स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा पकडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here