Home चंद्रपूर धक्कादायक :- वेकोलि च्या अधिकृत कॉलनीचे क्वार्टर व जमीन विक्री, अनधिकृत लोकांचे...

धक्कादायक :- वेकोलि च्या अधिकृत कॉलनीचे क्वार्टर व जमीन विक्री, अनधिकृत लोकांचे वाढले वास्तव्य,

 

वेकोलि प्रशासनाला इलेक्ट्रिक पाणी व इतर सुविधेचा कोट्यावधीचा चुना.

घूग्गूस प्रतिनिधी :-

वेकोलि वणी क्षेत्रातील शास्त्री नगर, बंगाली कैम्प रामनगर,इंदिरा,सुभाष नगर.गांधी नगर.असगर नाला व शालीकराम नगर या ठिकाणी काही अवैध व्यवसायी घुसले असून त्यांनी वेकोलि च्या क्वार्टर कब्जात करून ते क्वार्टर व वेकोलि च्या कब्जातील जमिनीची बेकायदेशीर विक्री चालवली असल्याची व त्यात वेकोलि चे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी तसेच सब एरिया मैनेजर यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वणी वेकोलि क्षेत्रात घूग्गूस निजलई क्षेत्रात काम करणाऱ्या वेकोलि कर्मचारी व अधिकारी यांचे क्वार्टर फार वर्षापूर्वी घूग्गूस लगत बांधण्यात आले होते त्यात काही वेकोलि कर्मचारी अधिकृतपणे तर काही बाहेरील प्रांतातील लोक अनधिकृतपणे राहतात व वेकोलिची शेकडो एकर जमीन पडित आहे त्या जमिनीची विक्री सुद्धा परस्पर केल्या जात आहे. या संदर्भात अनेकवेळा मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे तक्रारी दिल्या पण त्यावर अजून कारवाई झाली नसून अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना बाहेर काढले नाही. त्यामुळे वेकोलि ला दरवर्षी वीज पाणी व इतर सुविधेपोटी कोट्यावधी रुपयाचा नाहक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या प्रकरणात वेकोलि मुख्य महाप्रबंधक जातीने लक्ष देऊन बाहेरील लोकांना इथून बाहेर काढावे अशी मागणी होत आहे.

Previous articleसीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे शेतकऱ्याला व शेतमजूर यांना आर्थिक सहकार्य.
Next articleथरारक :- एका नराधमांने एकाच कुटुंबातील पाच जणांची केली हत्या, नागपुरात उडाली खळबळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here