Home वरोरा सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे शेतकऱ्याला व शेतमजूर यांना आर्थिक...

सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे शेतकऱ्याला व शेतमजूर यांना आर्थिक सहकार्य.

 

सोइट गावात अतिवृष्टीमुळे गोठ्याचे व शेतीपुरक साहित्याचे नुकसान झाल्याने मदतीचा हात.

वरोरा (प्रतिनिधी) :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी भद्रावती-वरोरा या आपल्या क्षेत्रातील जनतेला संकटाच्या काळात आर्थिक मदत व आवश्यक साहित्य पुरवठा करण्याचा धडाका लावला असून आजपर्यंत अनेकांना त्यांच्याकडून मदतीचा हात मिळाला आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांच्या पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून आज (दि.२०) ला वरोरा तालुक्यातील सोईट येथील अतिवृष्टीमुळे गोठ्याचे व शेतीपुरक साहित्याचे नुकसान झालेल्या शेतक-याला व शेतमजुराला आर्थीक सहकार्य करण्यात आले. शिवाय कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला रवि शिंदे यांनी स्वनिधीतून मदत केली आहे.

सोईट येथील प्रविण अरुण झाडे नामक शेतक-याच्या शेतातील गोठ्याचे अतिवृष्टीने नुकसान झाले. शेतीचे व शेतीपुरक अवजारांचे नुकसान झाले. याची दखल घेवुन रवि शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या कल्याणनिधीमार्फत दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश शेतक-याला वितरीत करण्यात आला. त्यानंतर याच शेतक-याचे वडील अरुण उध्दव झाडे (वय ६४) हे कोरोनामुळे (दि.३ मे) ला मरण पावल्यामुळे रविंद्र शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना स्वनिधीतुन मदत केली.
दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या सर्वच तालुक्यातील शाखेतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासल्या जात आहे. सोबतच रवि शिंदे यांचेही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात स्वनिधीतून भरीव मदतकार्य सुरु आहे.
याप्रसंगी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे, डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ता दत्ताभाऊ बोरेकर, वसंता मानकर, प्रमोद देवतळे, प्रदिप देवतळे, प्रफुल धोबे, विलासराव धंदरे, शंकर कुकडे, प्रमोद कोहपरे, प्रकाश भेदूरकर, युवराज चनेकार, बैंकेचे व्यवस्थापक नरेंद्र भोयर, निरिक्षक अरविंद भोयर, लेखापाल संजय आसुटकर, लिपिक धवणे, संदीप मांडवकर, वैभव धोटे, कुणाल गलांडे, विलास मडावी, आदी उपस्थित होते.
यावेळी संपन्न कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना रवी शिंदे यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले आहे.
सोबतच शेतीचा हंगाम सुरु असुन तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सतर्कतेचा ईशारा शिंदे यांनी दिला.

Previous articleकृषी वार्ता:- वरोरा तालुक्यात शेतीत सोयाबीन लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग.
Next articleधक्कादायक :- वेकोलि च्या अधिकृत कॉलनीचे क्वार्टर व जमीन विक्री, अनधिकृत लोकांचे वाढले वास्तव्य,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here