Home वरोरा कृषी वार्ता:- वरोरा तालुक्यात शेतीत सोयाबीन लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग.

कृषी वार्ता:- वरोरा तालुक्यात शेतीत सोयाबीन लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग.

 

वरोरा तालुक्यातील खापरी येथे सरीवरंबा पध्दतीने सोयाबीन लागवड.

खाबांडा
मनोहर खिरटकर:-

वरोरा तालुका कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य, तेलबिया कार्यक्रमाच्या माध्यमातून सरीव़ऱबा पध्दतीने मौजा खापरी गावात लागवड करण्यात आली यासाठी कृषी पर्यवेक्षक पी.एस लोखंडे आणि कृषी सहायक एम.एस .टिपले यांनी खापरी येथील शेतकरी बचत गटातील सदस्याना शंभर टक्के सुटिवर सोयाबीन बियाणे दिले आणि शेतीशाळा घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, त्यात काही शेतकऱ्यांनी पट्टा पध्दतीने सोयाबीन पेरणी केली आणि त्याच गावातील पांडुरंग गोपाळ साळवे यांनी आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रात Masu सहाशे बारा या सोयाबीन वाणाची बेडवर टोकण पद्धतीने लागवड केली हि केलेली तालुक्यातील पहिलीच नाविन्यपूर्ण लागवड आहे, दोन तासातील अंतर दिडफुट व दोन झाडातील अंतर एक फुट अश्यापद्धतीने ठेवण्यात आले, पांडुरंग गोपाळ साळवे याची जमीन पाणी धरून ठेवणारी (चिबळजमीन) असल्यामुळे त्यांनी या पद्धतीचा अवलंब केला आहे.
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गळीत धान्य अनुदान तत्वावर शेतकर्यांना बियाणे उपलब्ध घेण्यासाठी योजना सुरु केली होती, या योजनेत यंदाच्या खरीप हंगामात प्रमाणीत बियाणे प्रत्याक्षिक व बियाणे मीनी किट, महाडिबीडी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले त्यानुसार वरोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आँनलाईन अर्ज केले आणि कृषी विभागाने शंभर टक्के सुटिवर खापरी येथे एकोणीस शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले तर इतर शेतकऱ्यांना परमीट देवून सोयाबीन बियाणे वाटप केले, या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी कृषी पर्यवेक्षक पी.एस. लोखंडे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

प्रतिक्रिया……..।

मी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर आ़्ँनलाईन अर्ज केला आणि त्याच्या आधारावर कृषी सहायक श्री टिपले यांनी योग्य मार्गदर्शन करुन गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे प्रती तीस किलो दिले आणि पट्टा पद्धतीने पेरणी करण्याचे मार्गदर्शन केले पण माझी जमीन पाणी धरून ठेवणारी चिंबळ असल्याने मी दोन एकरात बेड बनविले आणि सोयाबीन टोबिव पद्धतीने लावले, मला खत्री आहे या केलेल्या प्रयोतून मला उत्पन्न जास्त मिळेल.
शेतकरी श्री पांडुरंग गोपाळराव साळवे
मौजा खापरी ता.वरोरा

सदर योजनेत खापरी येथील एकुण एकोणीस शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान तत्वावर तीस किलो प्रती शेतकरी याप्रमाणे बियाणे वाटप करण्यात आले उर्वरित योजनेतील अठ्ठरा शेतकऱ्यांनी सोयाबीन च्या प्रत्येक सहा ओळीनंतर दोन फुट अंतराचा पट्टा सोडून लागवड केली यात काही दिवसानंतर या दोन फुट जागेत डवर्याला दोरी बांधून सरी काढण्यात येईल यामुळे उत्तम प्रकारे मुलस्तर जंलसंधारण होवून शेतकऱ्यांना उत्पादन अधिक प्रमाणात वाढ होईल.
एम.एस.टिपले
कृषी सहायक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here