Home भद्रावती कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उघडलेल्या श्री मंगल कार्यालय येथील निशुल्क कोविड सेंटरची यशस्वी...

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उघडलेल्या श्री मंगल कार्यालय येथील निशुल्क कोविड सेंटरची यशस्वी सांगता.

 

कोरोना संकटात शिंदे परिवार सदैव जनतेच्या पाठीशी, सीडीसीसी बैँकेचे संचालक रवी शिंदे यांची ग्वाही.

भद्रावती प्रतिनिधी :-

कोविड-१९ च्या दुस-या लाटेदरम्यान दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांच्या पुढाकाराने भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या संयुक्त विदयमाने त्यांच्या स्थानिक गौरी ग्रीन्स फार्म व श्री मंगल कार्यालय येथे निशुल्क कोविड सेंटर उघडले होते. कोविड-१९ ची दुसरी लाट ओसरली असल्याने जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या आज (दि.२१) च्या पत्रान्वये कोविड केअर सेंटर मधील रूग्णसंख्या निरंक असल्याने तिस-या लाटेत आवश्यकतेनुसार पुनश्च कार्यान्वीत करण्याच्या अटीवर तात्पुरत्या स्वरुपात श्री मंगल कार्यालय येथील कोविड सेंटर आज (दि.२२) पासून बंद करण्यात आले व या निशुल्क कोविड सेंटरची सांगता करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनिष सिंग, कोविड सेंटरमधील परीचारीका, कर्मचारी यांच्या प्रचंड परीश्रमातून आरोग्यसेवेचा हा उपक्रम यशस्वी झाल्याचे रवि शिंदे यांनी सांगितले.
श्री मंगल कार्यालय येथील या कोविड सेंटरचा चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना लाभ झाला आहे.
रवि शिंदे यांनी भद्रावती येथील त्यांच्या मालकीचे श्री मंगल कार्यालय व गौरी ग्रीन्स फार्मचे कोविड केअर सेंटरमधे रुपांतर करुन प्रशासनाला सुपूर्द केले होते. केवळ इमारत प्रशासनाला सुपूर्द नाही केली तर त्यात सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.त्यात नाश्ता, जेवण, पाणी, ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीन, औषधी, मास्क, पीपीई किट, सॅनिटायजर या सर्व सुविधा उपलब्ध करुन निशुल्क कोविड सेंटर सुरु झाले होते. जवळपास ४०० बेडची क्षमता असणारी व्यवस्था या कोविड सेंटरमधे आहे. भद्रावती तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील लहान मुलांपासून तर जेष्टांपर्यंत कोरोनाबाधित रूग्णांनी या निशुल्क सेंटरचा लाभ घेवुन उपचार घेतले. यासाठी शिंदे यांनी कुठलाही शासकीय निधी घेतला नाही. ग्रामीण रुग्णालय, भद्रावती व नगर परीषद, भद्रावती यांच्या सहकार्याने हे शक्य झाले. केवळ कोविड सेंटरच नाही तर शिंदे परीवाराच्या वतीने हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला होता व लागुनच असलेल्या शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी ही निशुल्क करण्यात आली होती. हेल्पलाईन द्वारे २४×७ घरपोच वैद्यकीय सल्ला व उपचार पद्धती सांगण्यात येवू लागली होती. अनेक गरजु रूग्णांना प्लाज्मा डोनरची मदत करुन दिली होती. तात्काळ मदत हे या कोविड कार्यातील खास वैशिष्ट्य राहीले आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने व कोरोनाबाधित रूग्ण निरंक असल्याने शासनाच्या आदेशानुसार श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथील निशुल्क कोविड सेंटरची सांगता करण्यात आली.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवू नये व पहिल्या तथा दुस-या लाटेसारखी परीस्थिती पुन्हा उद्भवू नये, मात्र तिसरी लाट आलीच तर सदर कोविड सेंटर कोरोनाबाधीत रूग्ण व जिल्हा प्रशासनाच्या सदैव सेवेत राहील, जिल्हाधिकारींच्या अटींना अधिन राहून सदर कोविड सेंटर तात्पुरते बंद करीत आहोत, असे रवि शिंदे यांना प्रशासनाने कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here