Home महाराष्ट्र व्यक्तिवेध:- दिलदार मनाचे, राजसाहेबांना समर्पित बाळा नांदगावकर हे महाराष्ट्र सैनिकांचे स्फुर्तीस्थान!

व्यक्तिवेध:- दिलदार मनाचे, राजसाहेबांना समर्पित बाळा नांदगावकर हे महाराष्ट्र सैनिकांचे स्फुर्तीस्थान!

 

पक्षाच्या कठीण काळात राजसाहेबांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असणारे पाहिले नेते.

व्यक्तिवेध:-

खरं तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील राजकारणात जिकडे सत्ता तिकडे राजकीय नेत्यांच्या कोलांटीउड्या सुरू असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष स्थापनेनंतर असे कितीतरी संधिसाधु आले मानसन्मान प्रतिष्ठा मिळवली व जेंव्हा त्यांना लोक विचारायला लागले तेंव्हा त्यांनी राजसाहेबांच्या जीवावर मोठे झाले असताना सुद्धा पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात जावून सत्तेत सहभागी झाले त्यात प्रवीण दरेकर, वसंत गीते,राम कदम सह इतर नेत्यांचा समावेश आहे. परंतु राजसाहेब ठाकरे यांनी जेंव्हा पक्ष स्थापनेनंतर जेंव्हा पहिली जाहीर सभा शिवतिर्थावर घेतली होती तेव्हां बाळा नांदगावकर हे शिवसेनेचे आमदार होते तरीही त्यांनी सभा मंडपाच्या मागे राहून सभा ऐकली.त्या सभेत राजसाहेब ठाकरे म्हणाले होते की “जेंव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की आजपासून माझा हा बाळ महाराष्ट्राला अर्पण करीत आहे,पण आज माझ्या पाठीमागे हात ठेवायला बोलायला कोणी नाही, पण मी आज सांगतो आज या घडीला मी स्वतःला या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अर्पण करीत आहे.”

राजसाहेब ठाकरे यांच्या त्या भाषणांनंतर बाळा नांदगावकर यांनी आपल्या मनात निर्धार केला की मी आजपासून राजसाहेबांना अर्पण करेन आणि त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जावून विनंती केली की “राजसाहेब एकटे आहेत त्यांच्या पाठीमागे कोणी नाही त्यामुळे मला त्यांच्यासोबत जावे लागेल” या त्यांच्या ह्रुदयस्पर्शी विनंतीला बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा होकार दिला आणि मग राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत जणू सावली प्रमाणे बाळा नांदगावकर हे तब्बल १४ वर्षानंतर सुद्धा ठाम आहे. दरम्यानच्या काळात अनेक नेते कार्यकर्ते पक्षात आले मोठे झाले पण बाळा नांदगावकर यांच्यासारखी राजसाहेबांवर निष्ठा व महाराष्ट्र सैनिकांवर प्रेम कोणत्याच नेत्यांनी केले नाही ही वस्तुस्थिती आहे.

ज्या प्रमाणे सुदामाचे कृष्णावर निस्वार्थ प्रेम होते व कृष्णाचे सुदामावर प्रेम होते अगदी तसेच निस्वार्थी प्रेम व निष्ठा बाळा नांदगावकर यांची राजसाहेब ठाकरे यांच्यावर आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांना राजसाहेब ठाकरे नंतर बाळा नांदगावकर हे आपले नेते वाटतात व त्यांना आपल्या अडचणी समस्या ते मनमोकळेपणाने सांगतात. अशा या महाराष्ट्र सैनिकांचे आधारवड व स्फुर्तीस्थान बाळा नांदगावकर यांचा (आज २०जून ला) वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत असतानाच त्यांना परमेश्वर प्रदीर्घ आयुष्य देवो व त्यांच्या माध्यमातून पक्षाला उजाळा मिळून सन २०२४ च्या निवडणुकीत यश मिळो आणि जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचे राजसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊन महाराष्ट्रात मनसेची सत्ता येवो हीच भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल व साप्ताहिक व्रुत्तपत्र समूहाकडून मनसे नेते बाळा नांदगावकर यांना वाढदिवसाच्या रेल्वेभरून शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here