Home चंद्रपूर कामगार विश्व :- प्रशासकीय भवन च्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तोबा गर्दी.

कामगार विश्व :- प्रशासकीय भवन च्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तोबा गर्दी.

 

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे बांधकाम मजूर रिकाम्या हाताने परतले.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असली तरी लॉक डाऊन पूर्णतया संपले नाही त्यामुळे कोरोना नियम पाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. परंतु सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आज दिनांक 21 जून ला बांधकाम कामगार यांची तोबा गर्दी प्रशासनाच्या कोरोना नियमांची पायमल्ली करणारी व आरोग्य विभागाला वाकोल्या दाखवणारी ठरली असल्याचे चित्र दिसत होते.

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आज वरोरा तालुक्यातील बांधकाम कामगार, मजूर यांना जॉब कार्ड मिळणार होते व साहित्याची पेटी पण मिळणार होती.त्यासाठी किमान दोन हजाराच्या संख्येने स्त्री पुरुषांची गर्दी उसळली होती पण प्रशासनाकडे या गर्दीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा काम करत नव्हती व जवळपास 70 ते 90 किलोमीटर अंतराहून आलेल्या बांधकाम मजुरांची एक दिवसाची रोजी बुडाली शिवाय इथे येण्यास जवळपास पाचशे रुपये खर्च आला तो पण बुडाला आहे कारण सहाय्यक कामगार आयुक्तांनी जॉब कार्ड आता एक आठवड्यानंतर मिळणार अशी घोषणा केली आहे.खरं तर अगोदरच संभावित गर्दी बघता टप्प्याटप्प्याने बांधकाम मजुरांना बोलावले असते तर एवढी मोठी गर्दी उसळली नसती व त्या गरीब मजुरांची मजुरी वेळ व येण्याजाण्याचा पैसा वाचला असता पण नियोजन शून्य कारभारामुळे बिचाऱ्या बांधकाम मजुरांना आल्या पावली परतावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here