Home वरोरा मनसे निर्धार :-कोरोना काळात कायदा हातात घेणाऱ्या नगराध्यक्ष अली विरोधात न्यायालयात केस...

मनसे निर्धार :-कोरोना काळात कायदा हातात घेणाऱ्या नगराध्यक्ष अली विरोधात न्यायालयात केस होणार दाखल

 

जिथे प्रशासन हतबल झालं तिथे मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने हे वकीलातर्फे नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत?

वरोरा प्रतिनिधी :-

कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य जनतेला कोरोना च्या कडक नियमांचे पालन करावे लागले प्रसंगी दंड भरावा लागला पण गांधी चौकातील काही ठराविक दुकानांवर नगरपरिषद व तहसील प्रशासनाच्या टीम ने कारवाई केली म्हणून नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनीतिथे आपले २० ते २५ समर्थक नेऊन चक्क धिंगाणा घातला व पालिका कर्मचारी यांच्यावर संताप व्यक्त करून दुकानाला लावलेले सील तोडायला लावले.एवढेच नव्हे तर नगराध्यक्ष स्वतः तोंडाला मॉस घालून नव्हते व या घटनेचा विडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता, त्यामुळे संबंधित नगरपरिषद व तहसील प्रशासनाने नगराध्यक्ष अहेतेशाम अली व त्यांच्या समर्थकांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंद करणे आवश्यक होते. कारण लॉकडाऊन मधे ज्यांची दुकाने थोडा काळ जास्त उघडी असतांना प्रशासनाने त्या दुकानाला सील लाऊन व दंड आकारून त्यांची दुकाने काही काळासाठी बंद केलीत,अनेक दुचाकीस्वारावर मॉस न घातले म्हणून दंड आकारला तर मग गांधी चौकातीलच दुकानाचे सील तोडायला बिना मॉस नगराध्यक्ष आले व त्यांच्या समर्थकांनी धुडगुस घातला व त्यांनी उपस्थित नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे तक्रार करून उत्तर मागितले पण निगरगट्ट प्रशासनाने उत्तर तर दिले नाहीच आणि नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यावर कारवाई सुद्धा केली नाही.

इथल्या लोकप्रतिनिधी व मोठ्या राजकारण्यांना एक कायदा व सर्वसामान्य जनतेला दुसरा कायदा हे लोकशाहीत कसे काय शक्य आहे? त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी आपल्या वकिलांकडून उद्या वरोरा येथे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद व्हावा यासाठी न्यायालयात केस दाखल करणार आहे. महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची केस बहुदा महाराष्ट्रात प्रथमच असावी की ज्या नगराध्यक्ष यांनी शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याची नैतिक जबाबदारी पार पाडायला हवी होती तिथे स्वताच कायदा हातात घेऊन उलट त्या विरोधात बोलणाऱ्यांशी वैमनस्याने वागून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला आणि शहरातील काही नामांकित लोकांच्या सह्या घेतल्या व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. खरं तर यामुळे नगराध्यक्ष पदाची त्यांनी इज्जत वेशीवर टांगून नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी स्वतःची प्रतिमा जनसामान्यांत स्वतःहून बिघडवली अशी चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात सविनय कायदेभंग आंदोलन करणार होती पण कोविड चे नीयम पाळून ते आंदोलन करणे मनसेला शक्य नसल्याने व आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने आता न्यायालयात मनसे पदाधिकारी यांनी दाद मागणार असल्याची माहिती असून न्यायालयात नेमकी काय भूमिका न्यायालय घेईल? त्यात नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यावर गुन्हा नोंद करणार का? हा येणारा काळच ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here