Home चंद्रपूर मूल च्या तहसीलदार होळीचे पितळ उघडे पडल्यानंतर संपादकांना बेकायदा नोटीस.

मूल च्या तहसीलदार होळीचे पितळ उघडे पडल्यानंतर संपादकांना बेकायदा नोटीस.

 

प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया चे उल्लंघन केल्याचा होळीचा जावई शोध? तहसीलदार होळीची नार्को टेस्ट करणे गरजेचे?

रेती पंचनामा भाग – ३

मूल तालुक्यातील रेती घाटातून नियमांचे उल्लंघन करून रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवून लाखो रुपयाची वसुली करणारे तहसीलदार होळी यांचे पितळ भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून उघडे पडल्यानंतर तहसीलदार होळी यांना ही बाब प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मधील नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा साक्षात्कार झाल्याने त्यांनी बेकायदा संपादक यांना व्हाट्सअप वर नोटीस पाठवून स्वतःच कायदा हातात घेतल्याचा गंभीर प्रकार आता समोर आला आहे.

खरं तर ज्या अधिकाऱ्यांवर एखादा आरोप होतो तेंव्हा कुण्या संपादक वा पत्रकारांना तो अधिकारी स्वतःच्या कार्यालयांमार्फत नोटीस पाठवू शकत नाही कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एखादा भ्रष्टाचार वा शासनाच्या महसुलाची चोरी होत असेल तर त्याबाबत पोलखोल करण्याचे अधिकार प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मार्फत घटनेने पत्रकारांना दिले आहे, पण तहसीलदार होळी यांनी बातमी खोटी आहे व अवमानना करणारी असल्याचा जावई शोध लावून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो हल्ला केला त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

तहसीलदार होळी यांची नार्को टेस्ट करायला हवी.

रेती घाट व्यावसायिकांकडून अवैध मार्गाने वसुली करणारे तहसीलदार हे शासनाच्या लाखों रुपयाच्या महसूलावर पाणी फेरून स्वतःच्या तुंबड्या भरत असतांना सुद्धा ते जणू कायद्याच्या चौकटीत वसुली करीत असल्याचा आभास निर्माण करून स्वतः संपादक यांना नोटीस पाठवतात म्हणजे तहसीलदार किती चतुर भ्रष्टाचारी आहे हे शीद्ध होते.ज्या रेती घाटावर रेती उत्खनन होतंय तिथे नियमानुसार उत्खनन होत नसेल किंव्हा आवश्यक बाबी तिथे अंतर्भूत नसेल तर कायद्यानुसार दंड आकारणी करून तो महसूल शासनाच्या तिजोरीत जायला हवा पण तहसीलदार होळी त्याच गोष्टीचा फायदा घेत शासनाच्या तिजोरीत जाणारा महसूल स्वतःच हडप करताहेत त्यामुळे तहसीलदार होळी यांची नार्को टेस्ट करायला हवी तरच त्यांनी आतापर्यंत किती बेकायदेशीरपणे माया जमवली व शासनाचा महसूल बुडवला याची माहिती समोर येऊ शकते.

Previous articleधक्कादायक :- लातुरमध्ये खैरलांजी पेक्षाही भयानक घटना.
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here