Home धक्कादायक धक्कादायक :- लातुरमध्ये खैरलांजी पेक्षाही भयानक घटना.

धक्कादायक :- लातुरमध्ये खैरलांजी पेक्षाही भयानक घटना.

 

निलंगामध्ये 5 वर्षाचा लहान मुलाला जीवे मारण्याच्या हेतुने पाटलाने उचलु उचलु आपटुन रक्तबांबाळ केले.

निलंगा न्यूज नेटवर्क:-

पाटीलशाही अजूनही काही गावामध्ये रुजली असून बहुजन समाजातील अती मागास जातीतील व्यक्तींना जाणीवपूर्वक मारहाण व अन्याय करण्याच्या तक्रारी कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा शीद्ध झाले असून लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात केळगाव येथे राहणारे शत्रुघन लहु कांबळे त्यांची पत्नी लक्ष्मी कांबळे ,दोन मुली प्रतिक्षा आणि प्रज्ञा तर अवघ्या 4 वर्षाचा मुलगा प्रदिप शत्रुघन कांबळे,भाऊ लखन कांबळे आणि त्यांची पत्नी पुजा कांबळे हे शेती करण्यासाठी त्यांच्या शेतात गेल्यावर झरी या गावातील मराठा समाज्याचे ज्योतीराम हणमंतराव पाटील. दिनकर व्यंकटराव पाटील. लक्ष्मण पाटील. संगिता पाटील. हणमंत पाटील. किसन पाटील हे सर्व मिळुन शेतात आले, आणि आमच्या मराठा समाजाची जमीन तुम्ही खरेदी केली. तुमची औकात आहे, तुम्ही महारगे लोक आमच्या शिळ्या तुकड्यावर जगणारे आमची चाकरी करणारे लोक. तुम्ही ही जमीन करायची नाही . शेतात पाऊल टाकायचे नाही. नाहीतर तुमच्यासह तुमचा वंशजाला ही संपवुन टाकु असे म्हणुन त्यांना मारहाण केली.

केळगाव येथे राहणारे शत्रुघन लहु कांबळे यांच्या पत्नी आणि वहीणीला त्यांनी मारहाण केली व त्यांना खाली पाडुन त्यांचा विनंयभंग केला, त्यानंतर शेतातच असणाऱ्या त्यांच्या 4 वर्षाचा मुलगा प्रदिप याला उचलुन दोन वेळा शेतात आपटले आणि बोलला की तुमचा वंशज पण संपवून टाकतो.. पुन्हा तुमची खैरलांजी सारखी गत करतो. केळगाव येथे राहणारे शत्रुघन लहु कांबळे यांनी याआधी ही निलगा पोलिस स्टेशन ला लेखी तक्रार केली होती. लातुर पोलिस मुख्यालयातही तक्रार दाखल केली होती. या पाटला पासुन त्यांच्या जीवाला धोका आहे. तो पाटील आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतो. आम्हाला संरक्षण द्या. त्या पाटलावर कारवाई करा अशी मागणी शत्रुघन लहु कांबळे यांनी केली पण पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली व ज्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही.

दिनांक 1 जुलै 2021 रोजी शत्रुघन लहु कांबळे हे शेतात गेल्यावरवरील सर्वानी त्यांना जीवे मारण्याच्या हुतुनेच मारहाण केली. सर्वांना रक्तबांबाळ केले, त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा या मध्ये जीव गेला असता. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. गुन्हेगार पैशाच्या जोरावर अजुन मोकळेच आहे. त्यांना पोलीसांनी अटक केली नाही त्या गुन्हेगारांना अटक करावी
आणि मला न्याय मिळावा अशी विनंती शत्रुघन लहु कांबळे
(7028342994 7499268151) यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here