Home लक्षवेधी “मला होळी म्हणतात. अच्छा अच्छाची मी वाट लावली” तहसीलदार होळीच्या डरकाळ्या?

“मला होळी म्हणतात. अच्छा अच्छाची मी वाट लावली” तहसीलदार होळीच्या डरकाळ्या?

 

रेती घाट व्यावसायिकांना धमकावून तहसीलदारांच चांगभलं?शासनाच्या महसुलची चोरी, विभागीय चौकशी झाल्यास तथ्य येणार समोर.

रेती पंचनामा भाग-२

मूल तालुक्यातील तहसीलदार होळी यांच्या अरेरावी भूमिकेची सर्वत्र रेती व्यावसायिकांमधे दहशत असून रेती व्यावसायिकांना कायदा दाखवून ते स्वतःचा कसा आर्थिक फायदा करून घेत आहे हे आता उघड झाले आहे, एका रेती घाटात ते स्वतः पार्टनर म्हणून सहभागी असल्याची चर्चा असतानाच त्यांनी रेती व्यावसायिकांना एक वेगळ्या अंदाजात धमकाविण्याचा खेळ चालविला आहे. “मला होळी म्हणतात. अच्छा अच्छाची मी वाट लावली” अशा त्यांच्या डरकाळ्या? खरं तर फालतूगिरी असून ज्या रेती व्यावसायिकांनी आपले लाखों रुपये रेती घाट लिलाव घेण्यात लावले त्यांच्या मजबूरीचा फायदा तहसीलदार होळी घेत असल्याचा हा गंभीर प्रकार समोर येत आहे.

माझं कोण काय वाकडं करणार? जास्तीत जास्त माझी बदली होईल, या आविर्भावात तहसीलदार होळी यांनी राजुरा येथे आपली दादागिरी दाखवून आता मूल मधे सुद्धा हाच प्रकार चालविलेला आहे. शासनाचा लाखो रुपये पगार असतांना शासनाच्या तिजोरीत जाणाऱ्या महसुलाची चोरी ती सुद्धा राजरोसपणे करणारे तहसीलदार होळी बहुदा जिल्ह्यातील एकमेव तहसीलदार असेल अशीच एकूण परिस्थिती दिसत आहे. विशेष म्हणजे रेती घाटात जेसीबी मशीन असतांना ती जर पकडल्या गेली तर शासनाकडे जवळपास ७ लाख पेक्षा जास्त महसूल जमा होतो पण होळी यांनी तशा मशीन जप्त न करता जेसीबी मशीनच्या नावाखाली रेती व्यावसायिकांकडून ७ लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वतः कडे मागितल्याची चर्चा आहे.

तहसीलदार होळी यांनी स्वतःची प्रतिमा जणू भ्रष्टाचारमुक्त अधिकारी म्हणून करण्याचा प्रयत्न केला, पण दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात असे म्हटल्या जाते तसे होळी चे झाले असून रेती व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवून त्यांनी मागील चार महिन्यांच्या काळात तब्बल दोन कोटी रुपये कमाई केल्याची चर्चा आहे. महिन्याला एका रेती व्यावसायिकाकडून लाख रुपये घेणाऱ्या तहसीलदार होळी यांची विभागीय चौकशी झाल्यास व त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्यास खरी माहिती समोर येणार असून आता एका राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या विभागीय चौकशीची मागणी होणार असल्याचे पण ऐकिवात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here