Home भद्रावती क्राईम :- भद्रावती पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना केले जेरबंद.

क्राईम :- भद्रावती पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना केले जेरबंद.

 

मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघड १,५०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त.

जावेद शेख प्रतिनिधी :-

भद्रावती पोलीस स्टेशन मोटार सायकल चोरीचे ४ गुन्हे नोंद झाले होते त्याचा शोध पोलीस घेत असतांनाच दिनांक ०२.०७. २०२१ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की, काही दिवसापुर्वी पंचशिल वार्डात चोरी गेलेली मोटरसायकल हि आरोपी प्रशांत शुधांशु मलीक, वय १९ वर्षे, रा फुकट नगर, भद्रावती यांनी चोरी केली आहे. अशा खबरेवरून आरोपीस ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याचे मित्र रितीक अशोक जांभुळकर, वय २१ वर्ष, रा डोलारा तलाव, भद्रावती, प्रज्वल बबन बुरानकर, वय १९ वर्षे, रा फुकट नगर, भद्रावती व विधीसंघर्ष बालक रोहन विनोद सोळंके, वय १७ वर्षे, रा फुकट नगर, भद्रावती, प्रशांत मंगेश ताटेवार, वय १७ वर्षे, रा फुकट नगर, भद्रावती यांनी मो सा क्र एम एच ३४ बी जे ६४३८ कि अ २५,०००रू, मोसा क एम एच ३२ एन ७७५३ कि अ ३०,००० रु. मोसा क्र एम एच ३४ बी इ ९१४३ कि अ ७०,०००रू, मोसा क एम एच ३४ ओ डब्ल्यु ६१८१ कि अ २५,०००रू असा चोरी केला आहे. त्यावरून सदर आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हयात चोरी केलेल्या ४ मोसा कि अ १,५०,००० रू च्या जप्त करण्यात आलेल्या आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि.पोलीस अधिकारी निलेश पांडे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार पोशि केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, सचिन गुरनुले यांनी

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल.
Next article.. अखेर ‘ख-या बोगस आदिवासित्वाचा झाला पर्दाफाश?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here