Home चंद्रपूर खळबळजनक :- स्वतः कर्तव्यदक्ष असल्याचा बनाव करणाऱ्या तहसीलदार होळी ने सील...

खळबळजनक :- स्वतः कर्तव्यदक्ष असल्याचा बनाव करणाऱ्या तहसीलदार होळी ने सील केलेल्या रेतीची चोरी?

 

निखिल वाढई यांच्या तर्फे दिलेल्या निवेदनाला केराची टोपली? होळी वर शिस्तभंगाची कारवाई आवश्यक.

रेती पंचनामा भाग -४

कायद्याचा धाक दाखवून रेती व्यावसायिकांना लुटणाऱ्या तहसीलदार होळीच्या अनेक नतभ्रष्ट कथा आता समोर येत असून मूल तालुक्यातील चिचाळा येथील सील केलेल्या रेतीची चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर व निखिल वाढई या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या समर्थकांसह तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत त्या रेती चोरी प्रकरणात आरोपी कोण? याचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे तहसीलदार होळी यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. खरं तर स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात असतांना व तसे पुरावे ऑडियो विडिओ च्या माध्यमातून समोर आले असतांना बातमी प्रकाशित करणाऱ्या संपादकांना पदाचा दुरुपयोग करून नोटीस पाठवणे म्हणजे “चोरांच्या उलट्या बोंबा” उलट असाच प्रकार तहसीलदार होळीचा दिसत आहे त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई विभागीय चौकशीतून होऊ शकते अशी शक्यता बळावली आहे.

मूल तालुक्यातील मोजा चिचाळा येथे महिन्याभरापूर्वी 20 ते 22 ट्रॅक्टर चोरीची रेती एका कत्राटदाराला टाकली. वीस ते बावीस ट्रॅक्टर रेती साजा चिंचाळा येथील पटवारी यांनी जप्त केली होती, तहसीलदार होळी यांच्या आदेशानुसार रेती सील करण्यात आली परंतु सील केलेली ती रेती चोरट्यांनी तहसील प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून चोरून नेली, सदर रेती चोरीचा प्रकरण अत्यंत गंभीर असून चोरट्यांचा शोध लवकरात लवकर घेऊन चोरट्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल वाढई, प्रणीत पाल, आकाश येसणकर, रोहित शेंडे, धनराज चिमूलवार, स्नेहल गेडाम, सूरज गेडाम, साहिल खोब्रागडे या युवा वर्ग कार्यकर्त्यानी तहसीलदार होळी यांच्याकडे केली, मात्र स्वतःच भ्रष्ट असलेल्या तहसीलदार होळी यांनी त्या रेती चोरीचा ना तपास केला ना त्यावर काही समोरचे पाऊले उचलले त्यामुळे ती रेती चोरी करणाऱ्यांना तहसीलदार होळी यांनी वाचवण्यासाठी घरकुल धारकांना आपण रेती देत असल्याचा दिखावा केला असल्याची चर्चा असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडविनाऱ्या तहसीलदार यांची विभागीय चौकशी वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे.अगदी कमी काळात कायद्याचा धाक दाखवून व रेती घाट व्यावसायिकांना जेरीस आणून कोट्यावधी रुपये लाच म्हणून घेणाऱ्या तहसीलदार होळीयांची चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here