Home चंद्रपूर क्राईम रिपोर्ट :- पडोली परिसरात डिझेल चोरीचा गोरखधंदा जोरात?

क्राईम रिपोर्ट :- पडोली परिसरात डिझेल चोरीचा गोरखधंदा जोरात?

 

पेट्रोल पंपावरील महागड्या डिझेलला पर्याय चोरीचे डिझेल?लाखोंची उलाढाल.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर तालुक्यातील पडोली या औधोगिक परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असून जवळपास ३ ते ४ हजार हायवा ट्रक, पेट्रोल डिझेल चे टैंकर व इतर वाहन अवागमण करीत असतात दरम्यान त्या वाहनांचे ड्रायव्हर हे आपल्या वाहनातील डिझेल स्वस्त्यात विकून पैसे कमावतात.या परिसरात डिझेल चोरीचे काही ठिकाणी अड्डे बनवले गेले असून डिझेल चोरीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. या धंद्यात होणारा नफा हा जास्त असल्याने आता त्यामधे मोठी वाढ झाली आहे. एकीकडे डिझेल ९५ रुपये लिटर हे पेट्रोल पंपावर मिळत आहे तर दुसरीकडे हेच डिझेल चोर अड्ड्यावर ८० रुपये लिटर ने मिळत आहे त्यामुळे चोरीचे डिझेल घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे या धंद्यात आता पुन्हा काही चोरटे उतरले असून दिवसाकाठी जवळपास १० ते २० हजार लिटर डिझेल चोरी होत आहे तर ते चोरीचे डिझेल हातोहात विकल्या पण जात आहे.

डिझेल चोरी व विक्रीच्या धंद्यात जे लोक काम करतात त्यांची यादीच भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल प्रतिनिधी कडे आली असून या संदर्भात पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे की त्यांना या डिझेल चोरीची माहिती नाही? याबाबत मात्र तर्कवीतर्क लावले जात आहे पण या अवैध डिझेल चोरीत जे आपले हात ओले करताहेत त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालायला हवा अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here