Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्र्पुरात देशी विदेशी दारू दुकाने व बार चे उद्घाटन पण...

धक्कादायक :- चंद्र्पुरात देशी विदेशी दारू दुकाने व बार चे उद्घाटन पण दारूच मिळेना.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत मद्यपी परेशान? या तारखेला दारू होणार सुरू?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्याची दारूबंदी उठविल्यानंतर मद्यपी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते पण आता देशी विदेशी दारू दुकाने व बार सुरू होण्याच्या प्रतीक्षेत त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहे कारण दिनांक २ जुलैला चंद्रपूर शहरांमधील एका देशी दारू दुकानाचे उद्घाटन धुमधडाक्यात करण्यात आले पण दारूच सुरू झाली नाही त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

27 मे ला राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारू बंदी उठविण्याचा निर्णय घेतला होता व त्यानंतर ८ जुनं ला या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला. दारूची दुकाने आत्ता सुरू होईल नंतर सुरू होईल याची प्रतीक्षा मद्यपी बघत होते. शासन निर्देशाप्रमाणे 11 जून रोजी उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या नावे काढलेल्या आदेशांमध्ये दिशानिर्देश करीत व काही सूचना जाहीर करत कागदपत्र सादर करण्याचे कामे सुरू झाली. मुंबई राज्य आयुक्तांनी दिलेल्या दिशा निर्देशाप्रमाणे कागदपत्र सादर झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच दारू दुकानांचे परवाने नूतनीकरणाची कारवाई सुरू होईल असे जाहीर केले. अद्यापपावेतो राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील किती परवाने नूतनीकरण झाले याची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु २ जुलै रोजी चंद्रपूर शहरातील काही बार अॅड रेस्टॉरंट व देशी दारू विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची थाटात उद्घाटन केले. असे उद्घाटन नूतनीकरण किंवा अन्य कारवाई झाल्याशिवाय करू शकतात का हा चर्चेचा विषय ठरला आहे पण आता प्रत्यक्ष दारू सुरू होण्याच्या प्रतीक्षेत मद्यपी परेशान झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र येणाऱ्या सोमवार दिनांक ५ जुलै ला जवळपास ९८ देशी विदेशी व बार ची दुकाने सुरू होणार असल्याबाबतची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here