Home भद्रावती मी कोरोना सेवक आहो मला केंव्हाही आवाज द्या, मी जमेल ती मदत...

मी कोरोना सेवक आहो मला केंव्हाही आवाज द्या, मी जमेल ती मदत करायला तयार आहो- रवी शिंदे

 

माजरी येथे महिला बचतगट कर्ज वितरण व मार्गदर्शन मेळावा संपन्न

माजरी (प्रतिनिधी) :

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेच्या माध्यमातून महिलांच्या बचत गटांना कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणारे बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी वरोरा भद्रावती क्षेत्रातील महिलांच्या आर्थिक प्रगतीची एक चळवळ राबवली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली, मात्र या दुस-या लाटेत अनेकांचे आप्तस्वकीय बाधित झाले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकांच्या जवळच्या माणसांनी मृत्यूला गाठले. ही लाट ग्रामीण भागात पोहोचली होती. आता तज्ञ सांगत आहेत की तिसरी लाट लवकरच येईल, म्हणुन तिस-या लाटेपुर्वी ग्रामीण जनतेंनी सतर्क होणे आवश्यक आहे. प्रामुख्याने महिलांनी कोरोना योध्दा बणून कोरोना मुक्त प्रत्येक गाव करावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांनी माजरी येथे महिला बचत गट कर्ज वितरण मेळाव्यात केले.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर तर्फे नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डीजीटल साक्षरता शिबिर अंतर्गत महिला बचतगट कर्ज वितरण व मार्गदर्शन मेळावा आज (दि.५) ला तालुक्यातील माजरी येथील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन येथे पार पडला. पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की कोरोना काळात मी आरोग्य सेवक म्हणुन काम करीत आहो, त्यामुळे ग्रामीण भागात कोणालाही काही मदत लागल्यास मला आवाज दया, मी जमेल ती मदत नक्की करेन. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे, संचालिका नंदाताई अल्लूरवार, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, मानद सचिव श्यामसुंदर पोळे, रॉय, कान्होबाजी तिखट, हेमंत महातळे, भारत मांढरे, कालिदास उपरे, नामदेव डाहूले, फकरु ताजने, विठ्ठल येरेकर, कपिल रांगणकर, पैकाजी खंगार, गेडाम, गाटकीने, वडगावकर, पवार जोगी, मोहीतकर, राकेश मत्ते, आदी उपस्थित होते.

यावेळी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार अकरा बचतगटांना २० लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले. सरस्वती महिला बचत गट, कोंढा, सावित्रीबाई महिला बचत गट, कोंढा, सोनिया महिला बचत गट, पळसगाव, राधाकृष्ण महिला बचत गट, पळसगाव, मुक्ता महिला बचत गट, पळसगाव, रेणुका महिला बचत गट, कोंढा, आदर्श महिला बचत गट, कोंढा, संजीवनी महिला बचत गट, माजरी, साई महिला बचत गट, कोंढा, मातोश्री महिला बचत गट, कोंढा, उमेद महिला बचत गट, कोंढा या बचतगटांचा कर्ज वितरणात समावेश आहे.
शेवटी रवि शिंदे यांनी बँकेतर्फे सुरु असलेल्या विविध योजनांची माहीती उपस्थितांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here