प्रहार सेवक किशोर डुकरे यांच्या पुढाकाराने अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा.
वरोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खरा सुपुत्र जो शेतकऱ्यांना आपला बाप समजतो व अंध, अपंग, मूक, बधीर आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राणपणाने शासन प्रशासनासोबत लढतो त्या लढवय्या बच्चू कडू या लोकनेत्यांचा वाढदिवस महाराष्ट्रात साजरा करीत असताना वरोरा तालुक्यातील प्रहार सेवक तथा वरोरा तालुक्यातील ज्यांना बच्चू कडू समजल्या जाते त्या किशोर डुकरे यांनी त्यांच्या वाढदिवशी तालुक्यातील दिव्यांगांना आर्थिक मदत व फळ झाडे भेट देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला, एवढेच नव्हे तर तालुक्यातील शेतकऱ्यांना ५०० फळ झाडे देवून ते झाड आपल्या शेताच्या बांध्यावर लावण्याचा मुलमंत्र दिला.लोकनेते बच्चू कडू यांच्या वाढदिवशी लावलेले रोपटे हे रोपटे वटव्रुक्ष होईस्तोवर सांभाळा अशी विनंती पण केली.
वरोरा तालुक्यातील आसाळा येथे लोकनेते बच्चू कडू यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने व दिव्यांगांना मदत करून साजरा केला, याप्रसंगी आलेल्या सर्वाना मसाला भाताचे जेवण देण्यात आले. या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार राजू कुकडे, ज्येष्ट पत्रकार गांधी बोरकर.प्रहार सेवक जगदीश लांडगे, संदीप झाडे. दडमल गुरुजी इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी निखिल तिखट, पिंटू वासेकर, राहुल देठे, नितीन नागरकर, रवी भाऊ झाडे, सतीश कनोजवार, धर्मदास डुकरे, आशिष जांभुळे, हरिदास आसुटकर, माणिक डुकरे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मोरेश्वर डुकरे, आनंदराव देवगडे, गोपाळराव मिलमिले, अरुण गाडवे, दिनेश नन्नावरे, विठ्ठल जांभुळे, अनुराग डुकरे, चेतन डुकरे, साहिल देवगडे, प्रसाद मिलमिले, ओम डुकरे, भाऊराव आसुटकर इत्यादी प्रहार सेवक तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.