मालमत्तेच्या वादावरून आईच मुलाची वैरीन झाल्याने मुलाने घेतला टोकाचा निर्णय?
भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती टप्प्यावर ऐन मोक्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर बस स्थानक ला लागून असलेले सहयोग लॉजच्या मालकी हक्कावरून आई ने चक्क मुलाला डावलून त्या सहयोग लॉजची विक्री केली ते प्रकरण न्याय प्रविष्ट असताना विक्री झाली कशी? व वडिलांच्या मृत्युनंतर आई सोबतच मुलाचा अधिकार असताना या प्रकरणी पोलिसांनी परिस्थिती समजून न घेता आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला म्हणून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही आणि मी आत्महत्या करेन असा इशारा सहयोग लॉज च्या वरती चढून आत्महत्या करण्याच्या बेतात असणाऱ्या सहयोग यांनी उपस्थित लोकांच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.
शांती काशिनाथ चौबे यांच्या नावे सहयोग लॉज होते. परंतु सदर मालमत्ता ही काशिनाथ चौबे यांनी शांती चौबे यांना विकत घेऊन दिली होती जे आता या जगात नाही. हिंदू संयुक्त कुटुंब व्यवस्थेत वडिलांच्या संयुक्त मिळकतीतून विकत घेतलेल्या मालमत्तेत वडील मरण पावल्या नंतर मुलाचा अधिकार असताना स्वताची आई असलेल्या शांती चौबे यांनी आपल्या मुलींच्या सांगण्यावरून आपल्या मुलाला आपल्या पतीच्या मालमत्तेतून बेदखल केल्याने मुलगा सहयोग हा सहयोग लॉज च्या वरच्या माळ्यावर चढून आपल्या हक्काची लढाई लढत आहे. विशेष म्हणजे वडिलांनी ती मालमत्ता जरी स्वताच्या पत्नीच्या नावे घेतली असली तरी त्या मालमत्तेचे म्हणजे लॉज चे नाव हे सहयोग ठेवले यावरून तो मुलगा त्या मालमत्तेचा वारसदार आहे हे शीद्ध होते.
दरम्यान आपल्या आई ने सदर मालमत्तेतून बेदखल केल्याने त्यांनी मुलाने सहयोग लॉज मधे कब्जा करण्याकरिता आलेल्या तांडेकर यांना जॉब विचारला व ताबा देण्यास नकार दिला त्यावरून तान्डेकर यांनी सहयोग विरुद्ध पोलिस स्टेशन मधे तक्रार दिली असता सहयोग वर गुन्हा नोंद केल्याची माहिती सहयोग ला मिळताच तो सायंकाळी ५ च्या दरम्यान वरच्या मजल्यावर चढला आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही प्रसंगी या दोन मजली इमारती वरून उडी मारून आत्महत्त्या करीन असे आपल्या मित्रांना व त्यांच्या वकिलांना सांगितल्याने भद्रावती शहरात खळबळ उडाली आहे.आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात आणि त्या सहयोग ची आई आता कोणता पवित्रा घेतात की सहयोग आत्महत्या केल्यावर सगळी यंत्रणा जाग्रूत होणार हे येत्या दहा तासाच्या आत कळणार आहे.