Home चंद्रपूर दे धक्का :- तहसीलदार होळीच्या भ्रष्ट कारणाम्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

दे धक्का :- तहसीलदार होळीच्या भ्रष्ट कारणाम्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

 

नोटीस काढला ३ किंव्हा ४ जुलै ला आणि तारीख टाकली २८ जून? तहसीलदार यांच्या कामकाजाची चौकशी होऊन कारवाई होणार?

रेती पंचनामा भाग – ६

तहसीलदार होळी यांनी आम्हच्या विरोधात कायद्याच्या बाहेर जाऊन आम्हाला कारणे दाखवा नोटीस देऊन व आम्हच्यावर दबाव टाकून खोट्या गुन्ह्यात फसवीत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची तक्रार मूल येथील युवा वर्ग संघातील निखिल वाढई सह इतर कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे काल दिनांक ५ जुलैला केली.

मूल येथील युवा वर्ग संघातील तरुणांनी मूल तालुक्यातील रेती घाटात अवैध उत्खनन व जप्त केलेल्या रेती संदर्भात तहसीलदार होळी यांना दिनांक २८/६/२०२१ निवेदन देऊन अवैध रेती उत्खनन व जप्त केलेल्या रेतीची चोरी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती व त्या संदर्भात पुरावे सुद्धा तहसीलदार होळी यांना दिले होते, सदर निवेदनाची बातमी लोकशाही वार्ता व आताच एक्सप्रेस या वर्तमान पत्रात प्रकाशित पण झाली होती, परंतु तरीही रेती चोरी प्रकरण थंड बस्त्यात टाकल्याने शासनाच्या संपतीची चोरी थांबावी म्हणून तलाठी किरण मोडकवार यांना याबद्दल निखिल वाढई यांनी विचारणा केली होती. दरम्यान भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर तहसीलदार होळी यांच्या भ्रष्टाचार विरोधात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन संदर्भात दिनांक ३/६/२०२१ ला सदर पोर्टल वर बातमी प्रकाशित झाली होती.

तहसीलदार होळी यांनी कसा बेकायदेशीर नोटीस पाठवला?

भुमीपुत्राची हाक या न्यूज पोर्टल वर नावाचा जो उल्लेख करण्यात आला त्याच नावाने तहसीलदार होळी यांनी सर्वाना नोटीस दिली जेव्हा की दिनांक २८ जून च्या निवेदनात व दिनांक २९ जून च्या वर्तमानपत्रात जी नावे आहेत तशीच नावे भुमीपुत्राची हाक या न्यूज पोर्टल वर नाही अर्थात तहसीलदार होळी यांनी जी नोटीस पाठवली ती नोटीस दिनांक ३ जुलै ला भूमिपूत्राची हाक मधील आलेल्या नावावरून पाठवली हे शीद्ध होते,त्यामुळे तहसीलदार होळी यांनी पाठवलेल्या नोटीस मधे जो दिनांक २८ जून चा उल्लेख केलेला आहे तो खोटा असून तो नोटीस दिनांक ३ किव्हा ४ जुलै ला तहसिलदार यानी काढला असल्याचे स्पष्ट दिसत आहे, यावरून तहसीलदार होळी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने व बेकायदेशीर नोटीस पाठवून आम्हच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याने आम्हा सामाजिक कार्यकर्त्यावर तहसीलदार होळी अन्याय करीत आहे असे तक्रार कर्त्याने जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले असल्याने जिल्हाधिकारी सुद्धा काही वेळ स्तब्ध राहिले.

खरं तर ज्या तलाठयांसोबत सामाजिक कार्यकर्त्याने मोबाईल वरून चर्चा केली त्यात तलाठी यांना कुठलीही धमकी दिली नाही, केवळ शासनाचा रेती चोरी मुळे जो महसूल बुडाला त्याबद्दल प्रशासनाची कान उघाडणी केली जो त्यांचा अधिकार आहे पण तहसीलदार होळी यांनी सूडबुद्धीने बेकायदेशीर नोटीस पाठवून अन्याय केल्या जात आहे, त्यामुळे तहसीलदार होळी यांच्या संपूर्ण कामकाजाची व दिलेल्या नोटीस संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल वाढई, प्रणीत पाल, आकाश येसणकर, रोहित शेंडे, धनराज चिमूलवार गेडाम सूरज गेडाम साहिल खोब्रागडे इत्यादी युवा वर्ग संघातील कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रारी द्वारे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here