चंद्रपूर शहर मनविसे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांची मनपा आयुक्त यांच्या कडे मागणी.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
मनपा चंद्रपुर अंतर्गत चंद्रपुरच्या जनतेची पाण्यासंबधी कुठलीही भंटकंती होवु नये यासाठी मनपा प्रशासनाने अमृत पाणीपुरवठा योजना आणली शिवाय ते काम बऱ्याच दिवसापासुन चालु असुनही आजतागायत पुर्ण झालेच नाही. पाईप लाईन टाकण्साठी प्रत्येक वार्डाच्या गल्ली बोळीतुन पक्के बनवलेले रस्ते फोडुन व खोदुन पाईप लाईन टाकण्यासाठी काम संबधित कंत्राटदारानी केले मात्र खोदलेले खड्डे न बुजविल्याने परिसरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपुर करांच्या सेवेसाठी मनपा प्रशासन कटिबध्द आहे असे सांगीतले जात आहे व विविध विकासकामे दाखविल्या जाते पण ज्याठिकाणी मुबलक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी सुविधा दिल्या जात नाही. जनहितार्थ कामाकडे सातत्याने दुर्लक्ष करून मनपा मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट देऊन त्यातून पैसे खाण्याचा सपाटा चालविलेला आहे.
चंद्रपुर शहरात ज्या-ज्या ठिकाणी नविन पाईपलाईन टाकल्या गेली अशा सर्व ठिकाणचे खड्डे बुजविण्याची जबाबदारी देखील मनपा प्रशासनाची आहे. पावसाचे दिवस असल्याने बऱ्याच ठिकाणी खड्डे जलमय झाल्यानेे खड्डे दिसने कठीण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व महानगरातील अमृत योजनेच्या नावाखाली खोदलेले खड्डे बुजवा अन्यथा कुठलीही जिवित हानी झाल्यास मनपा प्रषासन पुर्णतः जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन देऊन लवकरच काम सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त यांच्याकडे केली.
हे 7 दिवसात खड्डे न बुजविल्यास मनपा समोर तीव्र जनआंदोलन केल्या जाईल. असा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष, सुयोग धनवलकर, चैतन्य सदाफळे ,शुभम शेंडे , प्रविन वाकडे उपस्थित होते