Home भद्रावती स्तुत्य :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचा स्तुत्य उपक्रम, महिलांना आत्मनिर्भर करण्याचा मानस.

स्तुत्य :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचा स्तुत्य उपक्रम, महिलांना आत्मनिर्भर करण्याचा मानस.

 

भद्रावती,चंदनखेडा व चोरा येथील महिला बचत गटाच्या महिलांना कर्ज वितरण मार्गदर्शनपर मेळावा संपन्न.

महिलांमधे कोविड-१९ विषयी केली जागृती. मान्यवरांचे मार्गदर्शन.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर तर्फे नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डीजीटल साक्षरता शिबिर अंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचतगट कर्ज वितरण व महिला मार्गदर्शन मेळावा भद्रावती येथे (दि.६) ला स्थानिक श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे पार पडला. या मेळाव्यात बोलतांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे म्हणाले की “कोरोनाकाळात मी आरोग्य सेवक म्हणुन काम करीत आहो, त्यामुळे कोणालाही काही मदत लागल्यास मला आवाज दया, मी जमेल ती मदत नक्की करेन” व महिलांमधे कोविड-१९ विषयी जागृतीपर मार्गदर्शन सुद्धा केले.

या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांच्यासह संचालक डॉ. विजय देवतळे, नागरी सह.पत. मर्या., भद्रावती नागरी पंत सस्था चे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, प्रा. ललित मोटघरे, प्रेमदास आस्वले, जेष्ठ नागरीक संघाचे कुटेमाटे गुरुजी, कौरासे गुरुजी, लेडांगे, राजुभाऊ पारखी, अजित फाळके, वांढरे, जोगी, आदी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बैँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सहा बचतगटांना ९ लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले. यामधे शारदा महिला बचत गट, कुनाडा, दुर्गा महिला बचत गट, कुनाडा, सावित्री महिला बचत गट, कुनाडा, सरस्वती महिला बचत गट, कुनाडा, रेणुका महिला बचत गट, कुनाडा, लक्ष्मी महिला बचत गट, कुनाडा या बचतगटांचा कर्ज वितरणात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here