Home चंद्रपूर श्री गुरुदेव महिला सेवा मंडळाच्या परिसरात बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

श्री गुरुदेव महिला सेवा मंडळाच्या परिसरात बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

 

मागील ३० वर्षापासून सेवा करणाऱ्या महिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरातील हिँगलाज भवानी परिसरात साधारणतः एक एकरांतील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारे अधिकृत शाखा म्हणून श्री गुरुदेव महीला सेवा मंडळ ही नोंदणीकृत संस्था कार्यरत आहे. मात्र महिलांना कमजोर समजून व त्यांच्यावर दादागिरी दाखवून त्या संस्थेवर बाबूराव झुरमुरे, भाऊराव ढोके, बापूजी बोबडे, तुकाराम खारटकर, जर्नाधन क्षिरसागर व इतर पुरुष मंडळींनी बोगस रजिस्ट्रेशन दाखवून कब्जा केल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे, विशेष म्हणजे ज्या सुमनताई चांदेकर या महिलेने या परिसरात आपल्या अथक परिश्रमांने इथे प्रार्थना स्थळ व इतर भक्त निवास बांधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला त्या महिलेला इथे बोगस गुरुदेव भक्त येऊ देत नसल्याने या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांनी तक्रार देऊन पत्रकार परिषद घेतली व आपली व्यथा पत्रकारांना सांगितली असता पत्रकारांना सुद्धा त्या महिलांबद्दल कळवळा आला असल्याचे चित्र निर्माण झाले.

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी संस्थेची चंद्रपूर शाखा म्हणून रजि.नं. २४७२ दिनांक १०/०४/१९८८ ला श्री गुरुदेव महिला सेवा मंडळ बाबूपेठ अशी नोंद केली होती व दिनांक ०५/०९/१९८९ ला स्थानिक धर्मदाय आयुक्त येथे नोंदणी क्रमांक महा. २७/८९ नुसार श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ बाबूपेठ ही संस्था नोंदणी केली. हिंगलाज भवानी बाबूपेठ येथे असलेल्या या संस्थेला मोठी जागा, प्रार्थना स्थळ, भक्त निवास आहे व यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करुन जनतेत जनजागृती करण्याचे कार्य सुरू असते परंतु “पोसल कुत्र जीवाला काळ” असं म्हटल्या जातं त्याप्रमाणे या परिसरात ज्या लोकांना सेवाभावी लोक म्हणून वावरू दिलं तेच लोक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारला पायदळी तुडवून चक्क त्या परिसरात आपला हक्क गाजवू लागले व ज्या महिलेने आपल्या अथक परिश्रमांने तिथे वास्तू निर्माण केल्या, तिथे अनेक सामाजिक उपक्रम घेतले, बाल संस्कार शिबिर असो महिला जाग्रुती असो की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती पुण्यतिथी असो प्रत्त्येक कार्यक्रम राबविऱ्या सुमनताईना बोगस भक्तांनी चक्क त्या परिसरातून हाकलून देऊन तिथे स्वतःचा कब्जा केला ही अत्यंत दुर्दवी बाब आहे.

सुमनताई यांना कुठून मिळाली प्रेरणा?

सुमनताई लहानपनी शिक्षण घेत असतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटल्या त्यांच्या त्या भेटीमुळेच त्यांनी सन १९८८ मध्ये गुरुकुंज मोझरी येथे जाऊन श्री गुरुदेव महिला सेवा मंडळाची चंद्रपूर शाखा तयार केली व नंतर सन १९८९ मध्ये स्थानिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करुन हिंग्लाज भवानी परिसारात प्रार्थना स्थळ बांधून राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार सुरु केला,

सुमनताई व त्यांच्यासोबत असलेल्या महिलांच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या या परिसरात वरिल बोगस गुरुदेव भक्तांनी कब्जा करण्यासाठी खोटे व बनावट रजिस्ट्रेशन क्रमांक वापरुन व त्या आधारे महानगर पालिकेत स्वतःच्या हयात “नसलेलया श्री गुरुदेव सेवा महिला आणि पुरुष मंडळ हिंग्लाज भवानी वार्ड, बाबुपेठ रजि. नं. ७८४४ हया नावाचा वापर करुन शासन प्रशासनाची दिशाभल केलेली आहे.
या संदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालयाने दिनांक २५/२/२०२१ ला दिलेल्या माहितीनुसार रजि. नं. ७८४४ हा महात्मा ज्योतीबा फुले माळी समाज बोर्डा या नावाने रजिस्ट्रर आहे. याचा अर्थ बोगस गुरुदेव भक्तांनी महिलांची फसवणुक करुन व त्यांच्यावर अन्याय करुन जोरजबरदस्ती संस्थेच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करण्याचे छडयंत्र रचले आहे हे शिध्द होते. त्यामुळे बनावट कागदपत्राच्या आधारे जमीन व प्रार्थना स्थळ हडपण्याचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी वरील बोगस गुरुदेव भक्तांवर कायदेशीर कारवाई करून आम्हा महिलांना न्याय दयावा अन्यथा आम्ही महिला राष्ट्रसंताच्या विचाराने सत्याग्रह आंदोलन करू असा इशारा काल दिनांक ५ जुलै ला पत्रकार परिषदेत दिला आहे. श्री गुरुदेव सेवा महिला मंडळबाबुपेठ द्वारा घेतलेल्या विविध कार्यक्रम उपक्रमाचे पत्रक व गैरअर्जदारांनी खोटे व बनावट कागदपत्रे दाखवून शासन प्रशासनाची दिशाभूल केली त्या पुराव्यांसह ही तक्रार अध्यक्ष, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांना देण्यात आली या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या सचिव सुमन ताई चांदेकर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड व संस्थेच्या महिला होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here