Home चंद्रपूर निंदनीय :- दुर्गापूर ठाणेदार धुळे यांचा अजब प्रकार, महिलेची बदनामी करणाऱ्यांना सूट...

निंदनीय :- दुर्गापूर ठाणेदार धुळे यांचा अजब प्रकार, महिलेची बदनामी करणाऱ्यांना सूट तर महिलेवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी?

 

चक्क विदेशातून महिलेच्या पतीच्या व्हाट्सअपवर ऑडियो पाठविणाऱ्या बदमाशाला सूट कशी?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

दुर्गापूर पोलीस स्टेशन मधे स्वप्नील धुळे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर येथील सामाजिक वातावरण बिघडत चालले की काय असेच वाटायला वाव मिळत आहे. इथे सर्वसामान्य जनतेला आता न्याय मिळण्याऐवजी अन्याय सहन करावा लागत असल्याचे अनेक प्रकरण उघडकीस येत आहे. “सदरक्षनाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीदाला हळताळ फासून ठाणेदार स्वप्नील धुळे आता आपल्या खाकी ची माती करत आहे की काय? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे उभा ठाकला आहे.

काही दिवसापूर्वी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील पती पत्नीच्या वादाची ठिणगी पडून पती घरून निघून गेला तो आलाच नाही म्हणून पत्नीने दुर्गापूर पोलीस स्टेशन मधे मिसींग ची तक्रार दाखल केली पण पती चक्क पोलीस स्टेशन मधे आल्यावर पत्नीला पोलीस स्टेशन मधे बोलावून ठाणेदार धुळे यांनी त्या फिर्यादी पत्नीवरच शब्दांची फायरिंग करून तिलाच धमकावले त्यामुळे ही बाब त्या मुलीला हादरवून गेली आणि आपल्याला आता दुर्गापूर पोलीस स्टेशन मधे न्याय मिळत नाही तिने काही सामाजिक कार्यकर्त्यां च्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि तेंव्हा कुठे जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्रात ही तक्रार गेल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला. आता त्या गोष्टीला वीस दिवस होत नाही तर दुसऱ्या एका प्रकरणात सुद्धा ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी तीच री ओढत एका विवाहित महिलेची ऑडियो व्हायरल करून बदनामी करणाऱ्याला सोडून त्या महीलेवरच गुन्हा दाखल करण्याची भाषा सुरू केली असल्याने ठाणेदार धुळे यांच्याकडून त्या महिलेवर अन्यायच होणार असल्याने आता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील हे प्रकरण फार गंभीर असून एका विवाहित महीलेसोबत तिथे कार्यरत एका अभियंत्यांच्या मुलाचे अनैतिक सबंध होते त्या संदर्भात ती महिला पुढे हे सबंध घातक ठरणार म्हणून त्या मुलासोबत ब्रेकअप घ्यायच्या तयारीत होती कारण तिला आपला संसार उध्वस्त करायचा नव्हता पण त्या मुलाने त्या महिलेवर बळजबरी चालवलेली होती परंतु ती मानायला तयार नसल्याने त्याने तिला तुझ्या पतीला सर्व हकिगत सांगतो म्हणून तिला ब्लैकमेल करीत होता व एके दिवशी तिच्या पतीच्या व्हाट्सअप वर चक्क विदेशी क्रमांक असलेल्या नंबर वरून ती संभाषणाची ऑडियो रेकॉर्डिंग पाठवली, त्याअगोदर त्या महिलेने याच प्रकरणातून फिनाईल पिवून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र त्यानंतर पतीने पत्नीला झालेल्या प्रकाराबद्दल माफी देऊन आपला संसार सांभाळण्याची ग्वाही दिली पण त्यानंतर त्या मुलाचे वडील व मामा मिळून पीडित महिलेच्या पतीला त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली त्यामुळे त्या पीडित मुलीने आता या प्रकरणाचा शेवट करण्यासाठी दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठले पण तिथे सुद्धा आधीच अन्यायाचा पाढा वाचणारे ठाणेदार धुळे यांनी चक्क ती तक्रार ची कॉपी घेतली नाही आणि कारवाई न करता त्यांच्यावरच दबाव टाकून तुम्हची बदनामी होईल त्यामुळे तुम्ही तक्रार देऊ नका असा सल्ला देऊन त्यांना दोन तास बसवून घरी जाण्यास सांगितले. यावरून ठाणेदार धुळे यांच्या कडून न्यायची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात चक्कर मारण्यासारखे असल्याचे संकेत मिळत असल्याने आता त्या पीडित महिलेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी न्याय मिळवून द्यावा अशी आर्त हाक त्या पीडित महिलेच्या परिवाराकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here