Home चंद्रपूर चिंतनिय:- समाज संघटनेच्या आडोशाने तहसीलदार होळीच्या उलट्या बोंबा?

चिंतनिय:- समाज संघटनेच्या आडोशाने तहसीलदार होळीच्या उलट्या बोंबा?

 

अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी हास्यास्पद?

रेती चोरी प्रकरण भाग -७

मूल तालुक्यातील रेती चोरी प्रकरणाची चौकशी करा अशा प्रकारचे निवेदन मूल तालुक्यातील युवकांनी तहसीलदार होळी यांना देऊन महिना उलटून गेल्यानंतर सुद्धा चोरट्यांना अजूनपर्यंत अटक झाली नसताना तहसीलदार होळी हे कर्तव्यदक्ष कसे? हा प्रश्न मूल तालुक्यातील जनतेपुढे उभा ठाकला आहे तर दुसरीकडे तहसीलदार होळी हे आपल्या समाज बांधवांच्या आडोशाने उलट्या बोंबा मारून कर्तव्यदक्ष असल्याचे प्रमाणपत्र स्वतःसाठी मिळवून घेऊन प्रशासन व्यवस्थेत जात आडवी आणत आहे ही बाब प्रशासन स्तरांवर अतिशय गंभीर असून एक प्रकारे तहसीलदार होळी हे शासन प्रशासनाची दिशाभूल  करीत आहे, कारण अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि त्या विरोधात प्रसारमाध्यमातून जर आवाज उठला तर समाजाच्या लोकांना समोर करायचं हा भाडोत्रीपणा खरं तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खपवून घ्यायला नको, कारण जिथे शासनाचे कायदे स्वतःच अधिकारी मोडत असेल आणि शासनाच्या महसुलची चोरी उघडपणे होत असेल तर कायद्यानुसार तहसीलदार यांच्यावर कारवाई व्ह्यायलाच हवी. पण जातीच्या आडोशाने भ्रष्टाचाराची पोल खोलणाऱ्या पत्रकारांवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल दाखल करण्याची जी हास्यास्पद मागणी तहसीलदार होळी करीत आहे त्यावरून आता तहसीलदार होळी यांना कळून चुकले की आपले पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत गेले तर आपले निलंबन पक्के आहे, त्यामुळे आधीच आपण समाज संघटनेचा वापर करायचा आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबवायचे.

खंडणीचा आणि तहसीलदार होळीचा काय सबंध?

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात संपादक राजू कुकडे यांच्यावर जो खंडणीचा आरोप लावण्यात आला त्याचा आणि होळी चा काय सबंध आहे ? हेच कळायला मार्ग नसून पत्रकारांनी जर एखाद्याच्या विरोधात बातमी लावली तर नेहमीच पत्रकारांवर खंडणी मागितली म्हणून आरोप होतो आणि विशेष म्हणजे संपादक राजू कुकडे यांच्यावर खंडणी चे जे आरोप लागले होते त्यात ते न्यायालयातून बरी झाले त्यामुळे कोणी उठसुठ खंडणी चे आरोप करणे म्हणजे संपूर्ण प्रसारमाध्यमांना वेठीस धरण्यासारखे आहे.

तहसीलदार होळीच्या मागे असणारे चेहरे होणार उघड?

संपादक राजू कुकडे यांनी आजवर जिल्ह्यातील बहुतांश प्रश्नाला घेऊन जे लिखाण केले त्याची दखल घेऊन प्रशासनाने अनेकदा कारवाई केलेली आहे मग ती अवैध दारूविषयी असो,अवैध कोळसा वाहतूक व चोरी असो की अवैध वाळू चोरी प्रकरणा विषयी. उदाहरण देण्याचे झाल्यास वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास सहा हजार ब्रॉस रेती उपविभागीय अधिकारी शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांनी जप्त केली ती रेती भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमी प्रकाशित झाल्यामुळेच. विशेष म्हणजे त्यापासून सरकारला जवळपास दोन कोटी रुपयाचा महसूल मिळाला आहे.मग जर राजू कुकडे यांच्या लिखाणामुळे शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळाला तर ते खंडणीखोर कसे? पण काही लोकांच्या पोटात राजू कुकडे यांच्या यशाबद्दल दुखणे सुरू होत आहे आणि ती जी मंडळी आहे त्यांच्या चित्र आणि चरीत्र्याचे पुरावे जर समोर आणले तर त्यांची गत काय होईल? याचे भान हरपलेली मंडळी तहसीलदार होळीच्या मागे असल्याचे दिसत आहे. पण बाहेरून उघड विरोध करता येत नाही म्हणून पडद्यामागून वार करणारी जी मंडळी आहे त्यांचे चेहरे हे उघड होईल एवढे मात्र खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here