Home भद्रावती कोरोना काळात उत्क्रुष्ट आरोग्य सेवे बद्दल नंदोरी ग्रामवाशीयां कडून रवी शिंदे यांचा...

कोरोना काळात उत्क्रुष्ट आरोग्य सेवे बद्दल नंदोरी ग्रामवाशीयां कडून रवी शिंदे यांचा सत्कार.

 

रवि शिंदे यांचे कोरोना काळातील कार्य नंदोरीवासीयांसाठी लाभदायकआश्लेषा जिवतोडे, उपसभापती, कृ.ऊ.बाजार समिती

नंदोरी, खुटाळा येथील बचत गटांना कर्ज वितरण व कोविड-१९ जागृतीपर मेळावा संपन्न.

नंदोरी (भद्रावती) :
कोविड-१९ च्या पुन्हा काही लाटा येतील, डेल्टा प्लस सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत जाईल, त्यामुळे प्रत्येकाने प्रशासनाचे नियम पाळावे, कोरोना लस घ्यावी, यासाठी चळवळ राबवून लसीकरण पुर्ण करावे, असे दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी नंदोरी येथे बोलतांना सांगितले.
नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डीजीटल साक्षरता शिबिराअंतर्गत नंदोरी, खुटाळा येथील बचत गटांना कर्ज वितरण व कोविड-१९ जागृतीपर मेळावा आज (दि. ९) ला नंदोरी येथील ग्रामपंचायत सार्वजनिक भवनात संपन्न झाला.
यावेळी रवि शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील नंदोरी येथील कोरोना योध्दयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तर नंदोरी ग्रामपंचायत तर्फे रवि शिंदे यांचा कोरोना काळातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
यावेळी रवि शिंदे यांचे कोरोना काळातील कार्य नंदोरीवासीयांसाठी लाभदायक ठरले, सुरवातीला शिंदे यांच्या निशुल्क कोविड सेंटरमधे नंदोरी परीसरातील अनेक कोरोनाबाधित रूग्ण भरती झाले होते, असे कृ.ऊ.बाजार समितीच्या उपसभापती, आश्लेषा जिवतोडे यांनी सांगितले व रवि शिंदे यांना राजकीय गुरु म्हणुन संबोधले.
बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दहा बचत गटांना १२ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. सोबतच हृदयविकारावरील शस्त्रक्रिया केलेले नामदेव मनोहर देवगडे या शेतक-याला ‘शेतकरी कल्याण निधी’ अंतर्गत ४०,००० रु. चे सानुग्रह निधी वाटप केल्या गेले.
बचतगटांमधे धनश्री महिला बचत गट, नंदोरी, सुजाता महिला बचत गट, नंदोरी, खुशी महिला बचत गट, नंदोरी, गौरी महिला बचत गट, नंदोरी, उडान महिला बचत गट, नंदोरी, प्राजक्ता महिला बचत गट, खुटाळा, इंदिरा महिला बचत गट, खुटाळा, मानिका महिला बचत गट, खुटाळा, लक्ष्मी महिला बचत गट, खुटाळा, राणी दुर्गावती महिला बचत गट, खुटाळा, आदी बचत गटांचा सहभाग आहे.
यावेळी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, संजय तोटावार, डॉ. विजय देवतळे, माजी अध्यक्ष शरद जिवतोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती आश्लेषा जिवतोडे, नंदोरीचे सरपंच शरद खामनकर, उपसरपंच मंगेश भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद लांबट, भटाळी-पानवडाळा सेवा सह. संस्थेचे विजय बाराहाते, विस्लोन-पावना-धानोली सेवा सह. संस्थेचे सुदाम चिडे, डोंगरगाव सेवा सह. संस्थेचे हनूमान टाले, वसन्ता आवारी, विस्लोन सेवा. सह. संस्थेचे दत्तू कोरडे, पानवडाळा सेवा सह. संस्थेचे गजानन उताने, विलास देठे, विभागीय अधिकारी विलास जोगी, शाखाधिकारी मिलिंद कळवे, व्यवस्थापक एम.जी. वडगावकर, निरिक्षक पी.एल. ढोकपांडे, पवार, आदी उपस्थित होते.

Previous articleचिंतनिय:- समाज संघटनेच्या आडोशाने तहसीलदार होळीच्या उलट्या बोंबा?
Next articleधक्कादायक :- अपात्र असणाऱ्या व MPSC ने मनाई केलेल्या उमेदवारांना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले PSI.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here