Home चंद्रपूर खळबळजनक :- बल्लारपुर आरपीएफ रेल्वे कस्टडीत आरोपीच्या मृत्युने खळबळ.

खळबळजनक :- बल्लारपुर आरपीएफ रेल्वे कस्टडीत आरोपीच्या मृत्युने खळबळ.

 

मृतकच्या आई वडिलांची या प्रकरणी ‘घातपात कि हत्या; या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीची मागणी.

चंद्रपुर प्रतिनिधी :-

बल्लारपूर आरपीएफ रेल्वे पोलिसांच्या बाबतीत जनता अतिशय संशयास्पद पद्धतीने बघत असून दिनांक 13जुलै ला
चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका आरोपीचा आरपीएफच्या पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी (13 जुलै) ला उघडकीस आली आहे. अनिल गणपत मडावी (वय 29) असे मृत आरोपीचे नाव आहे. कुटुंबियांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विरुर पोलीस ठाण्या हद्दीत चोरीच्या आरोपाखाली आरोपी अनिल गणपत मडावी याला अटक करण्यात आली होती. काल सोमवार’ला साऊथ आरपीएफ चौकीत आणण्यात आले होते. हाताला दुखापत झाल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री दहा च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला. दिवसभर या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. मात्र, मंगळवार दि.१३ रोजी दुपारनंतर या घटनेची माहिती बाहेर आली. घटनेचं नेमकं कारण काय? याबाबत चर्चेला उधाण आले असून, हा घातपात तर नाही नं असा संशय व्यक्त करीत कुटुंबीयांनी उचस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर येथे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधे झालेल्या गोळीबाराने उडाली खळबळ.
Next articleदखलपात्र :- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने देशमुख प्रकरणातील शासनाच्या महसूल विभागाचे आदेशच दाबून ठेवले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here