Home चंद्रपूर शैक्षणिक :- शिक्षण फि वाढीच्या विरोधात पालकांमध्ये आक्रोश, पालकांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

शैक्षणिक :- शिक्षण फि वाढीच्या विरोधात पालकांमध्ये आक्रोश, पालकांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

इंग्रजी माध्यमांच्या शाळेने भरमसाठ फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत.

मूल प्रतिनिधी :-
कोरोना संक्रमणामुळे देशात टाळेबंदी लागु करण्यात आली, शिक्षणावरही मोठा परिणाम झाला, आजही शाळा बंद आहेत, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने अनेक शाळेनी भरमसाठ फि आकारणे सुरू केले आहे, यामुळे पालकांमध्ये आक्रोष निर्माण झाला आहे, शिक्षण फि रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी पालकांनी मूलच्या अनेक अधिकाÚयांची भेट घेतली व निवेदन दिले.
मूल तालुक्यात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, मुलांना शिक्षण चांगले मिळत असल्याने पालकांनी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला, सर्व सुरळीत असतांना देशात कोरोना संसर्ग फोफावला आणि शासनाने काही दिवसासाठी शाळा बंद करण्याचे आदेश दिले, मूल येथील अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचे कारण पुढे करून भरमसाठ शिक्षण शुल्क पालकांकडुन वसुल केले जात आहे, शिक्षण शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांना टार्गेट केले जाते. विद्यार्थी घरी येवून पालकांना शुल्क भरण्यासाठी रडगाणे करतात, कोरोना परिस्थीती निर्माण झाल्याने टाळेबंदी लागु करण्यात आली, यामुळे अनेक पालकांचा रोजगार बुडालेला आहे, मात्र शिक्षण संस्थेनी शिक्षण शुल्क भरण्यासाठी पालकांना वारंवार तगादा लावतात, यामुळे पालकांमध्ये शाळेप्रती तिव्र रोष व्यक्त करीत खाजगी शाळा पालक संघर्ष समिती निर्माण करण्यात आली, यासमितीने सोमवारी मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, गटशिक्षणाधिकारी खांडरे, मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, आणि नगर पालीकेचे शिक्षण सभापती मिलींद खोब्रागडे यांनी निवेदन दिले,
शिक्षण फि रद्द करण्यात यावे, एका वर्गात 35 विद्यार्थी पेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात येवू नये, वारंवार अभ्यासक्रम बदलविण्यात येवू नये, जुने पुस्तक घेण्याची परवानगी देण्यात यावी, पालकांची आमसभा घेवून शिक्षक पालक संघाची निवड करण्यात यावे, शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारणीचे फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावे यासह विविध मागण्या पालकांनी अधिकाÚयांना भेटुन केले, शाळा आणि पालकांची काही दिवसात सभा घेण्यात येईल असे आश्वासन अधिकाÚयांनी यावेळी पालकांना दिले.
निवेदन देताना पालक नंदकिशोर रणदिवे, प्रशांत समर्थ, राकेश रत्नावार, मंगेश पोटवार, विवेक मुत्यालवार, मनिष येलट्टीवार, अॅड. बल्लु नागोशे, शाम उराडे, राकेश ठाकरे, संजय भुसारी, गिरीश कांचनकर, भोजराज गोवर्धन, अजय गड्डमवार, विनोद कामडी, आरीफ पठाण, कुमार दुधे, गणेश रामशेट्टीवार, गौतम जिवणे, अरविंद करपे, अमित राउत, प्रशांत गट्टुवार, गौरव शामकुडे यासह मोठया संख्येनी पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here