Home चंद्रपूर धक्कादायक :- जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या?

धक्कादायक :- जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या?

 

खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या उमेश नैताम याने केलेल्या आत्महत्तेचे रहस्य गूलदस्त्यात.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी या एका कैद्याने आत्महत्या केली होती. यामुळे कारागृहातील या गंभीर प्रकरणाची वरिष्ठांकडून वेळीच दखल होणे गरजेचे आहे.

खरं तर चंद्रपूर जिल्हा कारागृहात अशा प्रकारच्या घटना होणे म्हणजे जिल्हा कारागृहात सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखे आहे. आत्महत्या केलेला उमेश नैताम
हा कैद्यी गडचिरोली जिल्ह्यातील हत्या प्रकरणातील आरोपी मागील 11 महिन्यापासून जिल्हा कारागृहात बंदिस्त होता. मागच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील कैदी हा आजाराने मरण पावला होता काही दिवस ह्या घटनेला उलटत नाही तर 21 जुलैला खुनाच्या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याने आता जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, उमेशने आत्महत्या का केली? याचे कारण गूलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here