Home चंद्रपूर फसवणुकीच्या गुन्ह्यात निलंबित पटवारी विनोद खोब्रागडे यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा?

फसवणुकीच्या गुन्ह्यात निलंबित पटवारी विनोद खोब्रागडे यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा?

 

सामाजिक माध्यमावर संपादक राजू कुकडे विरोधात फिरत असलेल्या स्क्रिप्टचे रहस्य झाले उघड?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

मूल चे तहसीलदार होळी यांच्या विरोधात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरू असलेली बातम्यांची मालिका ही वस्तुस्थिती ला धरून असून तहसीलदार होळी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडवला व स्वताचे खिसे गरम केले त्याचे पुरावे व साक्षीदार असल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ सचिव संजय कन्नावार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर. विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे केली. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा या संदर्भात शासन प्रशासनाकडे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्वरित कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा दिला होता.

मनसे कडून झालेल्या पत्रकार परिषदेचा धसका घेत तहसीलदार होळी यांनी सगळे पर्याय थकले असल्याने राष्ट्रीय पटवारी म्हणून स्वतःच स्वतःला बिरुद लावून घेऊन नसल्या उचापती करणारे विनोद खोब्रागडे यांना हाताशी घेतले व संपादक राजू कुकडे यांच्या विरोधात खोटी व बनवाबनवी असलेली बदनामीकारक स्क्रिप्ट व्हायरल केली.पण विनोद खोब्रागडे याला अगोदरच राजू कुकडे यांनी निलंबित करायला प्रशासनास भाग पाडले असल्याने विनोद खोब्रागडे यांचे राजू कुकडे विरोधात आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहे  व  त्याचे पुरावे समोर आणल्याने तहसीलदार होळी यांचा हाही प्रयत्न फोल ठरत आहे.

कोण आहे हा विनोद खोब्रागडे?

स्वतःला कायदेपंडित समजणारा विनोद खोब्रागडे हा पटवारी म्हणजे फसवणूक करणारा व स्वतःच्या प्रशासनातील त्रुटी काढून आपल्याच अधिकाऱ्यांना टार्गेट करणारा आहे. यांनी जीवती तालुक्यात असताना शेकडो शेतकऱ्यांना बोगस शेत जमिनीचे पट्टे देऊन लाखो रुपयाची लुबाडणूक केली होती त्यामुळे मनसेचे तत्कालीन जिल्हा संघटक राजू कुकडे यांनी पटवारी विनोद खोब्रागडे यांचे बिंग फोडले व बोगस शेत जमिनीच्या पट्ट्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्या मागणीची दखल घेत पटवारी विनोद खोब्रागडे यांच्यावर शेत जमिनीचे बोगस पट्टे दिल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

विनोद खोब्रागडे यांनी राजू कुकडे यांच्यावर केला होता ५० लाखांचा दावा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजू कुकडे यांच्या नेत्रूत्वात जेंव्हा बोगस शेत जमिनीचे पट्टे देणाऱ्या पटवारी विनोद खोब्रागडे यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली होती तेंव्हा विनोद खोब्रागडे यांनी राजू कुकडे यांच्यावर ५० लाख रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात विनोद खोब्रागडे यांचे निलंबन उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी केल्यामुळे विनोद खोब्रागडे चा ५० लाखांचा दावा हवेतच राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here