Home Breaking News खळबळजनक :- अखेर तहसीलदारास तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

खळबळजनक :- अखेर तहसीलदारास तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

 

वाळू प्रती ट्रॅक्टर १५ हजार या प्रमाणे ३० हजार रुपयांचा हप्ता घेतांना तहसीलदारास अटक.

भंडारा वार्ता:-

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याचे तहसीलदार होळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना आता त्याच पद्धती ने हप्ता वसुली करणाऱ्या तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांना तीस हजारांची लाच घेतांना अटक करण्यात आली  असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तहसीलदार यांनी प्रति ट्रॅक्टर १५ हजार या प्रमाणे ३० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता.
कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी देण्याकरता ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याचे तहसीलदारास भंडारा लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

देविदास बोंबुर्डे असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. लाच प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यामुळे सध्या भंडारा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून जिल्ह्यातील तलाठी, बाबुंचे धाबे दणाणले आहेत.
तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्याकडे असलेल्या २ ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी आरोपी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर १५ हजार या प्रमाणे ३० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता. मात्र तक्रारदार वाळू व्यावसायिकास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत विभाग गाठत याबाबत तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचत लाचलुचपत विभागाने या तहसीलदारास 30 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. आरोपी तहसीलदार विरुद्ध लाच प्रतिबंधित कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ही वाळू वाहतुकीतून मिळणाऱ्या मलाईपोटी अनेक अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. लाचलुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असणार एवढे मात्र निश्चित

Previous articleचिंतनिय:- बोगस गुरुदेव भक्तांनी जबरदस्ती घेतला खऱ्या गुरुदेव भक्त महिलांच्या प्रार्थना स्थळांचा ताबा.
Next articleशेती वार्ता :- सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नवी हरितक्रांती निर्माण होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here