Home चंद्रपूर खळबळजनक :- पोलीस कर्मचारी राजेश मोगरे कडून एका महिलेवर बलात्कार ?

खळबळजनक :- पोलीस कर्मचारी राजेश मोगरे कडून एका महिलेवर बलात्कार ?

 

रामनगर पोलीस स्टेशनमधे महिलेची तक्रार पण कारवाई नाही? मोठे सेक्स रॉकेट समोर येण्याची शक्यता?

क्राईम पंचनामा :-

चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी आपसी सहमतीने लैंगिक सैराचर सुरू असून यामधे घरगुती महिलांसह अल्पवयीन मुली पण सामील असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे, मात्र एका पोलीस कर्मचारी यांच्याकडून एका विवाहित महिलेवर जोरजबरदस्तीने बलात्कार व्हावा व तिला कुठे वाच्यता केलीस तर जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्या पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार होऊन सुद्धा गुन्हा दाखल होऊ नये म्हणजे कायदा सुव्यवस्था स्वता पोलीस प्रशासन बिघडवित असल्याचे चित्र दिसत आहे. आणि त्यामुळेच आज सर्वसामान्य जनतेचा पोलिस खात्यांवरवरचा विश्वास उडाल्याच्या अनेक घटना समोर येत असल्याने जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस स्टेशन मधील राजेश मोगरे नावाचा पोलीस कर्मचारी हा स्वताचा संसार उध्वस्त केल्यानंतर दुसऱ्या एका विवाहित महिलेचा संसार उध्वस्त करण्यासाठी प्रेमाचे नाटक करतोय अशी आपबीती खुद्द पीडित महिलेने पोलीस स्टेशन मधे दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानंतर सुद्धा आरोपी राजेश मोगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे ती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेली तर त्या दरम्यान तो पोलिस कर्मचारी राजेश मोगरे त्या पीडित महिलेला चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अश्लील शिवीगाळ करून म्हणतो की “माझं तू काय बिघडविनार मी जर निलंबित झालो तर काहीच फरक पडत नाही पण तू जिवंत राहतो का ते बघ.तू माझी नाही तर मी कुणाची होऊ देणार नाही” म्हणजे पोलीस कर्मचारी राजेश मोगरे हा त्या महिलेच्या प्रेमात वेडा झाला की त्याला तिचे चरित्र हनन करायचे आहे हेच कळत नसून पोलीस प्रशासन त्या पोलीस कर्मचारी यांच्यावर का गुन्हे दाखल करत नाही याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

पिडितेने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती देतांना म्हटले आहे की माझा पतीसोबत माझे वैवाहिक वाद झाल्याने मी मागील अनेक वर्षापासून माझ्या आई वडिलांकडे वरोरा येथे राहते व माझे अर्जनवीस म्हणून चंद्रपूर येथे काम सुरू असल्याने मी चंद्रपूर येथे सुद्धा राहते. दरम्यान काही दिवसापूर्वी पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांची वंदना गवळी या महिलेच्या माध्यमातून ओळखी झाली. तेव्हापासून त्यांनी मागील दोन महिन्यात माझेवर जोरजबरदस्ती चालवली व तुझ्या नवऱ्याला माझ्यासोबत सबंध असल्याचे सांगतो नाहीतर मी म्हणतो ते कर असे नेहमी धमकावीत होता.

असे फसवून पीडित महिलेवर केला बलात्कार?

दिनांक ३० जून ला पीडित महिलेला वंदना गवळी हिचा अपघात झाल्याचे खोटे सांगून वरोरा नाका चौकात बोलावले दरम्यान तूकूम येथील पोलीस क्वार्टर मधे पीडित महिलेला बहाणा करून वंदना गवळी हिने नेऊन तिथे रात्री त्या पिडितेवर राजेश मोगरे यांनी बलात्कार केला व तू जर कुणाकडे सांगशील तर तुला ठार मारेन म्हणून तिला चाकू दाखवला.आता आपली पोल खुलणार म्हणून वंदना गवळी हिचे कडून पीडित महिलेच्या पतीचा मोबाईल क्रमांक घेऊन त्याला फोन केला व तुझ्या बायकोचे माझ्यासोबत सबंध आहे म्हणून त्याला सांगून पीडित महिलेला नवऱ्याकडून बेदम मारहाण करायला लावली व राजेश मोगरे पोलीस कर्मचारी यांनी या प्रकरणातून अलगत सुटण्याचा प्रयत्न केला पण पीडित महिलेने रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार केली असून अजूनपर्यंत पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ज्या वंदना गवळी या महिलेचे नाव समोर येत आहे त्यावरून जर योग्य पोलीस तपास झाला तर मोठे सेक्स रॉकेट समोर येऊ शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here