Home चंद्रपूर धक्कादायक :- भाजप चे शहर अध्यक्ष डॉ.गुलवाडे यांनी कोरोना काळात लुटले रुग्णांचे...

धक्कादायक :- भाजप चे शहर अध्यक्ष डॉ.गुलवाडे यांनी कोरोना काळात लुटले रुग्णांचे 94 लाख.

 

चंद्रपूर मनपाच्या लेखा परीक्षण अहवालात सत्य आले समोर.शिबिर आयोजित करून रुग्णांचे पैसे परत करण्याचे मनपाचे आदेश.

राजकीय पंचनामा :-

कोरोनाच्या संकट काळात अनेकांनी या आजाराला बाजार बनविण्याचे धोरण अवलंबून कोट्यावधी रुपयाची लूट केली होती ती आता समोर आली असून भाजप चे चंद्रपूर शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी संकटात सापडलेल्या रुग्णांच्या नातेवाईक यांच्याकडून तब्बल 94 लाख रुपयाची अतिरिक्त लूट केली असल्याचे चंद्रपूर मनपाच्या लेखा परीक्षण अहवालातून समोर आल्याची धक्कादायक घटना नुकतीच प्रकाशझोतात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रोफेसर, आयएमए अध्यक्ष व भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोरोना काळात कोविड रुग्णांची पिळवणूक करून त्यांचेकडून अवाजवी रक्कम वसुली केली होती, जिथे 40 बेडची परवानगी त्यांना मिळाली असताना त्यांनी 80 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले ही सर्व बाब मनपाच्या लेखा परीक्षणात उघडकीस आली. मात्र सत्ताधारी भाजप पक्षाचा शहर अध्यक्ष असलेल्या डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यावर मनपा द्वारे कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे अशी जनतेची कोरोना संकट काळात आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या डॉ मंगेश गुलवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक नंदू नागरकर यांनी केली आहे.यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, अश्विनी खोब्रागडे उपाध्यक्ष मा. प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, अनु दहेगावकर जिल्हाध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, शलिनी भगत शहर अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग उपस्थित होते.

गुलवाडे या बड्या डॉक्टरांना सोडून लहान डॉक्टरांवर मनपाने केली कारवाई.

चंद्रपूर मधील अनेक रुग्णालयात रुग्णांकडून अवाजवी बिल आकारून त्यांच्या आजारपणाचा फायदा काही डॉक्टर घेत होते त्यात डॉ. गुलवाडे यांच नाव अग्रणी असून जिथे राजकारणातून समाजकारण व सेवा केल्या जाते तिथे डॉ. गुलवाडे यांनी राजकारणातून आपला धंदा उभा केला होता.खरं तर वर्धा जिल्ह्यात एकाही खाजगी डॉक्टरांनी आपलं स्वतःच कोविड हॉस्पिटल उघडले नाही तर त्या सर्वांनी शासकीय रुग्णालयात आपली सेवा दिली मात्र त्यातून तसूभरही प्रेरणा न घेता चंद्रपुरात डॉ गुलवाडे यांनी आपलं वैद्यकीय दुकान थाटून चक्क कोरोनाचा बाजार भरविला होता.

आता या गंभीर प्रश्नी मनपाच्या लेखा परीक्षण अहवालानुसार रुग्णांचे 94 लाख रुपये शिबिर आयोजित करून परत देण्याचे आदेश मनपाने दिले असून आता मनपाच्या आदेशाचे पालन होणार की नाही?यावर जनतेत यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Previous articleखळबळजनक :- पोलीस कर्मचारी राजेश मोगरे कडून एका महिलेवर बलात्कार ?
Next articleअसंविधानिक व मागासवर्गीयांना त्रासदायक असलेला कायदा 2000 रद्द करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here