Home चंद्रपूर धक्कादायक :- पत्नीने कट रचून प्रियकराकडून केला पतीचा खून.

धक्कादायक :- पत्नीने कट रचून प्रियकराकडून केला पतीचा खून.

प्रियकर  संजय टिकले साथीदार विकास नगराळे यासह पत्नी प्राजक्ता ला बल्लारपूर पोलीसांनी केली अटक.

बल्लारपूर प्रतिनिधी :-

समाजात शारीरिक सुखाच्या मोहापाई स्वताच्या पतीचा खून करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत असून बल्लारपूर शहरातील “पती पत्नी आणि प्रियकर यांच्या त्रिकोणी लढ्यात अखेर पती चा खून प्रियकराकडून पत्नीने खून करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खून तेंव्हा लक्षात आला जेंव्हा बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी पोत्यात भरून असलेले एक शव सापडले आणि पोलिसांचा तपास सुरू झाला. या पोलीस तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समोर आले, मृत ‘मारूती काकडे (वय 34) हा वेकोली मधे कोळसा खाणीत खाण करीत होता. तो मद्यपी असल्याने पत्नी प्राजक्ताशी त्याचे नेहनीच कौटुंबिक वाद होत असत. त्यातच प्राजक्ताचे स्वतःच्या बहिणीचा दिर ‘संजय टिकले’सोबत सूत जमले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले होते. त्यांच्या प्रेमात अडसर ठरलेल्या पती ‘मारूतीचा’ काटा कायमचा दूर करण्याचा मग त्यांनी कट रचला. आपल्याला यामुळे सरकारी नोकरी मिळेल व प्रियकरासह विवाह करून आयुष्य सुखी होईल, अशी प्राजक्ताची यामागे योजना होती.

नकोडा येथे केले काम तमाम?

बल्लारपूर येथून दूर असलेल्या नकोडा येथे रचलेल्या कटाची सांगता करण्यात आली. त्यात प्रियकर संजय टिकले साथीदार विकास नगराळे यांनी संयुक्त कट रचला व ठरलेल्या कटाप्रमाणे विकास मृताच्या घरी पोचला. भाड्याने घर मिळेल का, याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याला बाहेर बोलावून त्याला दारू पाजण्याचे आमिष दाखविण्यात आले. घरून बाहेर निघाल्यावर नकोडा येथेच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. तो जिवंत राहू नये, यासाठी त्याला नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर शव एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी फेकण्यात आले.

पोलीसांनी पत्नीचे बिंग फोडले

पोलिसांनी या प्रकरणाचा अगदी कसोशीने तपास केला व पत्नी कडून लपवालपवी व बरोबर उत्तर मिळाले नसल्याने पोलिसांचा पत्नी प्राजक्ता विषयी संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी मृताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केल्यावर आरोपींना अटक केली गेली. यात पत्नी प्राजक्ता, तिची आई कांता म्हशाक्षेत्री, प्रियकर संजय टिकले व कटात सहभागी साथीदार विकास नगराळे यांना वेड्या ठोकल्या या प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here