Home चंद्रपूर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात आता आठ वाजेपर्यंत सुरू राहणार बाजारपेठा.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात आता आठ वाजेपर्यंत सुरू राहणार बाजारपेठा.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिधुगुर्ग, बीड, नगर, रायगड आणि पालघरमध्ये जुनेच नियम लागू.मुख्यमंत्री यांची घोषणा.

वेब न्यूज वार्ता :-

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या कमी होणाऱ्या जिल्ह्यात स्थीतीलता देण्यात आली असून या रुग्णसंख्या मर्यादित असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्या सह इतर जिल्ह्यात दुकानं रात्री 8 पर्यंत खुली असणार आहेत. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिधुगुर्ग, बीड, नगर, रायगड आणि पालघरमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम रहाणार. इतर जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानं आठ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.मुंबईमध्ये सर्व दिवसांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडी राहू शकतील असं महानगर पालिकेनी म्हटलं आहे.

याआधी, रुग्ण वाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवतो आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेतला नाही असंही ते म्हणाले होते.

शनिवारी दुकानं दुपारी तीन वाजेपर्यंत उघडी राहतील तसेच गार्डन आणि प्ले ग्राउंड व्यायामासाठी उघडणार आहेत. चित्रपट थिएटर्स बंद राहतील असे सांगण्यात आले आहे.

Previous articleधक्कादायक :- पत्नीने कट रचून प्रियकराकडून केला पतीचा खून.
Next articleमागणी :- कुठल्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडता वीज बीलात हप्ते पाडून सवलत द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here