Home चंद्रपूर मागणी :- कुठल्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडता वीज बीलात हप्ते...

मागणी :- कुठल्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडता वीज बीलात हप्ते पाडून सवलत द्यावी.

 

मनसेची महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यांच्याकडे मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना काळात वीज ग्राहकांना सवलत देण्यापेक्षा उलट 18 ते 20 टक्क्यांनी वीज दारात वाढ करून आता वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडल्या जात असल्याने ते त्वरित थांबवून वीज ग्राहकांना तीन ते चार हप्ते पडून वीज बिल भरण्याची सवलत देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देशपांडे यांना दिलेल्या निवेदनातून मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड. जिल्हा सचिव किशोर मडगुलवार. तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर.शहर संघटक मनोज तांबेकर. तुषार येरमे, अर्चना आमटे, वर्षाताई बोंगले, महेश गडपेलीवार, शैलेश सदालावार इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणांत वीज निर्मिती होऊन त्या वीज निर्मिती केंद्राच्या प्रदूषणाचे येथील जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात असा वैद्यकीय अहवाल आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊन सुद्धा महावितरण कंपनी येथील वीज ग्राहकांना कुठलीही सूट न देता उलट कोरोना काळात वीज बीलात सूट द्यायला हवी असताना त्यात 18 ते 20 टक्क्यांनी वीज बीलात वाढ करते हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर एक प्रकारे अन्याय असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी सगळ्या पोलीस स्टेशन मधे तक्रारी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पण त्यानंतर सुद्धा राज्य सरकार व महावितरण कंपनी व्यवस्थापनाने याची दखल न घेता आता जनतेचे वीज कनेक्शन तोडण्याचे सत्र सुरू केले आहे जे निषेधार्थ आहे.

कोरोना काळात राज्यातील जनतेचे रोजगार गेले, त्यांना स्वतःच्या घरी राहावे लागले त्यामुळे छोटे व्यावसायिक सुद्धा बेरोजगार झाले होते त्यामुळे ज्याअर्थी हाताला काम नाही व सरकार काहीतरी मदत देईल या आशेवर महाराष्ट्रातील जनता सरकारकडे आस लावून बघत होती मात्र सरकारने जनतेचे वीज बिल माफ केले तर नाहीच उलट संकट काळात वीज बीलात वाढ करून जनतेचे आर्थिक शोषण केले आहे आणि आता महावितरण कंपनी जोरजबरदस्तीने थकीत वीज बिल ग्राहकांचे वीज कनेक्शन कापायला निघाली आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे या संकटात वीज बील एकावेळी भरणे वीज ग्राहकांना कठीण जाणार असल्याने वीज ग्राहक आत्महत्या करण्यास प्रव्रूत्त होऊ शकतो त्यामुळे आपण या विषयी गांभीर्याने विचार करून थकीत वीज ग्राहकांना वीज बिलाचे हप्ते पाडून सवलत मिळवून द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

Previous articleमहाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात आता आठ वाजेपर्यंत सुरू राहणार बाजारपेठा.
Next articleधक्कादायक :- शेतीच्या वादात सख्ख्या भावाचा कु-हाडीने वार करून केला खून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here