Home चंद्रपूर धक्कादायक :- शेतीच्या वादात सख्ख्या भावाचा कु-हाडीने वार करून केला खून.

धक्कादायक :- शेतीच्या वादात सख्ख्या भावाचा कु-हाडीने वार करून केला खून.

 

लहान भावाने थोरल्या भावावर मिरची पावडर फेकून केला वार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

आजकाल माणूस आपल्या स्वार्थासाठी रिश्ते नाते आणि स्नेहबंध सुद्धा विसरला आहे,असा एक दुर्दवी प्रसंग घडला असून शेतीच्या शुल्लक वादामधुन लहान भावाने थोरल्या भावावर मिरची पावडर फेकून व मागेहून कु-हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मूल तालुक्यातील सिंतळा येथे दिनांक 4 ऑगस्ट 2021 ला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात स्मशान शांतता पसरली आहे.

मूल तालुक्यातील सिंतळा येथील रहिवाशी विश्वनाथ वैरागडे असे मृत भावाचे नाव आहे. विश्वनाथ पुंजाराम वैरागडे (६५) आणि सुनिल पुंजाराम वैरागडे (४२) दोघेही सख्खे भाऊ. दोघांमध्ये अनेक वर्षापासुन वडीलोपार्जीत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादामधुन लहान भाऊ सुनिल वैरागडे याने मोठा भाऊ विश्वनाथ वैरागडे याचा काटा काढण्याचा बेत आखला. काल सकाळी ११.३० वा. चे सुमारास विश्वनाथ म्हैसी घेवुन सिंतळा रेगडी मार्गावरील शेताकडे जात असताना त्याच्या पाळतीवर असलेला सुनिल सायकलने त्यांच्या मागे गेला. मार्गावरील पुलाजवळ विश्वनाथला गाठुन त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत त्याचे पाठी मागेहुन कु-हाडीने विश्वनाथच्या डोक्यावर वार केले. कु-हाडीचे वार जबर असल्याने विश्वनाथ जागीच गतप्राण झाला. मोठा भाऊ विश्वनाथला यमसदनी पाठविल्यानंतर सुनिल स्वतः कु-हाड घेवुन एका चारचाकी वाहनाने मूल येथील पोलीस स्टेशन गाठले. भावाला ठार केल्याचे सांगत स्वतःला अटक करून घेतली. सुनिलकडून घटनेची माहिती होताच ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी सहका-यांसह घटनास्थळ गाठुन पंचनामा करून मृतक विश्वनाथचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. मृतक विश्वनाथला दोन मूल असुन सुनिलला एक मुलगी आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे आणि ठाणेदार यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत ठवरे

Previous articleमागणी :- कुठल्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडता वीज बीलात हप्ते पाडून सवलत द्यावी.
Next articleन्याय :- पत्नीचा खुन करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here