Home चंद्रपूर सनसनीखेज :- आमदार किशोर जोरगेवार यांनी केला हजारो ब्रॉस रेतीचा साठा ?

सनसनीखेज :- आमदार किशोर जोरगेवार यांनी केला हजारो ब्रॉस रेतीचा साठा ?

एवढ्या मोठ्या प्रमाणांत असलेल्या रेती साठ्यांची टीपी असल्याची किशोर जोरगेवार यांची माहिती खरी का?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत जनतेला 200 युनिट वीज बिलांचे गाजर दाखवून आमदार झालेले किशोर जोरगेवार यांनी तो विषय आता बासनात गुंडाळला असून आता त्यानी आपली स्थावर मालमत्ता वाढविण्यावर भर देणे सुरू केले आहे, “भाड ने जाए जनता अपना काम बनता.” या वाक्याला सार्थक करून जनतेच्या हिताच्या प्रश्नांना तिलांजली देत त्यांनी स्वहित साधण्याचा सपाटा चालवलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अय्यपा मंदिर रस्त्यांच्या कडेला कार्मेल अकदेमी च्या मागे जवळपास 1000 ब्रॉस पेक्षा जास्त रेतीचा साठा तयार केला असून त्या ठिकाणी एक फोर व्हिलर घेऊन व्यक्ती त्याची रखवाली करतो तर एक चौकीदार पण तिथे राहतो अशी माहिती आहे.

टीपीच्या रेतीच्या साठ्यांला परवानगी कुणाची?

खरं तर रेती घाटातून रेती उत्खनन करून त्याचा साठा करण्याची मंजुरी ही स्थानिक तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून घेण्यात येते शिवाय रेती स्टॉक करायचा असेल तर रेती घाटा च्या जवळपास 2 किमी अंतरावर तो रेती साठा असायला हवा मग किशोर जोरगेवार यांच्या अय्यपा मंदिर रस्त्यांच्या कडेला असलेल्या रेती साठ्याला मंजुरी देतांना 2 किमी अंतर बघितले गेले का? विशेष म्हणजे ह्या रेती साठ्याला मंजुरी आहे तरी कुणाची? हा मोठा गंभीर प्रश्न असून या ठिकाणी एक प्रतिनिधी यांनी जावून चौकशी केली असता त्यांनी तिथे उपस्थित एका व्यक्तीला रेती साठय़ा बद्दल विचारले असता हा रेती साठा आमदार किशोर जोरगेवार यांचा असल्याची त्यांनी माहिती दिली. ही बाब खरी आहे की खोटी म्हणून त्या प्रतिनिधी यांनी सरळ आमदार किशोर जोरगेवार यांना याबद्दल भ्रमणध्वनी वरून विचारले तर त्यांनी तो साठा माझाच आहे व त्या रेती साठ्यांची माझ्याकडे टीपी आहे असे सांगितले. पण एवढा मोठा रेती साठा साठवून ठेवण्याची मंजुरी नेमकी दिली कुणी याबद्दल संभ्रम कायम आहे.

आमदारच रेतीच्या धंद्यात तर बाकीच्यांचे काय?

आजकाल सर्व राजकारणी आपल्या काही समर्थकांना पाठबळ देऊन अनेक अधिकृत आणि अनधिकृत उद्धोग करतात पण सरळ आमदार रेतीच्या व्यवसायात स्वतःचा उद्धोग आहे असे म्हणतो म्हणजे मग बाकी रेतीच्या धंद्यात असणाऱ्या लोकांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. लाखों रुपयाच्या या रेती साठ्यांची पाहणी स्वता तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी केल्याची माहिती तिथे असलेल्या चौकीदाराने दिली याचा अर्थ तो रेती साठा कोणत्या रेती घाटावरून आला हे तहसील प्रशासनाला माहीत असून रेती साठ्याला तहसील प्रशासनाची मूक संमती आहे हे स्पष्ट दिसत आहे. एरव्ही सर्वसामान्य लोकांच्या रेती साठ्याला कायदा आड येतो मग किशोर जोरगेवार यांना सूट का? आणि टीपी असलेला रेतीचा साठा एखाद्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात करता येतो का? याचे उत्तर जर चंद्रपूर च्या तहसीलदार आणि इतर महसूल अधिकाऱ्यांनी दिले तर बरे होईल अशी जनतेची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here