Home चंद्रपूर धक्कादायक :- दीपक आसावानी हा दोन बायकांचा दादला तीसरीच्या चक्कर मधे फरार?

धक्कादायक :- दीपक आसावानी हा दोन बायकांचा दादला तीसरीच्या चक्कर मधे फरार?

 

पहिली विवाहित आदिवासीं पत्नीची रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार. माझ्या पतीचा सर्व पोलीस स्टेशनमधे फोटो लावा अशी केली मागणी.

आरोपी पती विरोधात अक्ट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

एक दोन नव्हे तर चक्क तीन प्रेमिका बनविणाऱ्या भामटय़ां दीपक आसावानी यांची चितरकथा तेंव्हा प्रकाशात आली जेंव्हा पहिल्या आदिवासी पत्नीने चंद्रपूर शहराच्या रामनगर पोलिस स्टेशन मधे दीपक आसावानी ह्या आपल्या भामटय़ां पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत नमूद करण्यात आले की दीपक आसवानी यांनी सदर आदिवासी महिलेची फसवणूक करून तिचे शारीरिक, मानसिक, आर्थिक व भावनीक शोषण केले आणि नेहमीच पतीचे मित्र स्वप्नील केलझरकर यांनी सुद्धा पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. मात्र पती कडे बघून पीडित महिलेने ते सहन केले.

दीपक आसवानी हा वाहन सीज करण्याचे काम करतो. व हयांच्या भावाची आंबेडकर पुतळा, मेन रोड जवळ असलेल्या श्रीकृपा रेस्टॉरेंट च्या बाजूला कपडे विक्री ची दुकान आहे. तिथे तो बसत असतो. दरम्यान दि 09/03/2016 रोजी त्याने आदिवासी विवाहित महिलेशी लग्न करून घेतल्यानंतर त्याने काही दिवसांमधेच वरोरा येथे नेहरू वार्ड मधे राहणाऱ्या मुस्लिम तरुणी सोबत प्रेमसंबंध स्थापित करून तिला मित्र स्वप्नील केलझरकर यांच्या मदतीने अमरावति येथे पळवून घेउन गेला होता आणि तिथे त्यांनी त्या तरुणीचा धर्म परिवर्तन करून घेऊन पहिल्या विवाहित पत्नीला माहिती होउ न देता दि.09/05/2016 रोजी भामटय़ां दीपक आसवानी यांनी त्या मुस्लिम मुलीसोबत चंद्रकला विवाह मंडळ, विजय कॉलनी, रुख्मिणी नगर, अमरावती मधे विवाह केला. सदर विवाह प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले होते. मात्र मुस्लिम पत्नी सोबत त्यांने दुर्व्यव्यवहार केल्याने त्याने दीपक आसवानी याची साथ सोडली.

बायकांच्या नादात मदमस्त झालेल्या दीपक आसवानी यांनी पहिली आदिवासी पत्नी हिच्या घरी आपला डेरा टाकला आणि जवळपास चार वर्ष तिचे सोबत एकत्र राहिल्या नंतर पुन्हा अनेक मुलीसोबत त्याचे अनैतिक सबंध राहिले व काही दिवसापूर्वी एका मुलीच्या तो प्रेमात पडला त्यामुळे पहिल्या पत्नीने त्याला विचारले असता तो नेहमीच खोटे बोलत होता पण शेवटी तो पहिल्या पत्नीच्या घरी येत नसल्याने पहिल्या पत्नीने त्याला एका चंद्रपूर शहरातील अपार्टमेंट मधील रूम मधे तिसऱ्या प्रेमीके सोबत पकडले असता त्याचे बिंग फुटले आणि त्याच्या तिसऱ्या प्रेमाचा पत्ता लागला त्यामुळे पहिल्या पत्नीने त्याचे विरोधात रामनगरच्या पोलीस स्टेशन मधे भामटा आरोपी पती दीपक आसवानी यांच्या विरोधात मा.दं.वि. कलम 498ए. 417, 494, 34 तसेच अनुसुचित जाति आणि अनुसुचित जमाति (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(आर). 3(1)(5). 3(2)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली होती. आता रामनगर पोलीस स्टेशन मधे तिसऱ्या प्रेमात पडलेल्या दीपक आसवानी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून मुख्य अनुसूचित जनजाति कायद्यांतर्गत गुन्हा नोंद व्ह्यायचा बाकी आहे. मात्र दोन बायकांचा दादला दीपक आसवानी यांच्यावर मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवणूक करण्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा व ह्या भामटय़ांपासून सर्वानी सावध राहावे यासाठी पोलीसानी याचे फोटो प्रत्त्येक पोलीस स्टेशन मधे लावावे अशी मागणी पीडित पत्नी हिने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here