Home चंद्रपूर अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी खोट्या तक्रारी संदर्भात घेतला महत्वाचा निर्णय.

अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी खोट्या तक्रारी संदर्भात घेतला महत्वाचा निर्णय.

चौकशी होईस्तोवर आटमुर्डी गट ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर अटकेची कारवाई नाही.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

आटमुर्डी गट ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर सचिवांच्या खोट्या तक्रारी वरून खोटे गुन्हे दाखल केल्याने ते त्वरित मागे घेऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या सचिवावर गुन्हे दाखल करावे व जोपर्यंत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्याची चौकशी करण्यात येणार नाही तोपर्यंत सरपंच उपसरपंच यांना अटक करण्यात येऊ नये अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यासह आटमुर्डी बेलगाव ग्रामपंचायत च्या नागरिकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे केली होती व घटनेच्या संदर्भात सरपंच उपसरपंच हे कसे निर्दोष आहे हे साक्षदार व घटना स्थळी चे पुरावे देऊन पटवून सांगितल्या नंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांना फोन करून आदेश दिला की जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होणार नाही तोपर्यंत सरपंच उपसरपंच यांना अटक करायची नाही. त्यांच्या या आदेशाने आटमुर्डी गट ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांनी एकच जल्लोष व आनंद व्यक्त केला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की आटमुर्डी गट ग्रामपंचायत सरपंच विठ्ठल जोगी, उपसरपंच जयदेव लभाने यांच्या विरोधात सचिव जी, एन, खानेकर यांनी जी वरोरा पोलीस स्टेशन मधे दिनांक ३१/७/२०२१ ला रात्री २१.५१ वाजता तक्रार केली ती पूर्णतया खोटी व बनावट पुराव्यावर आधारित असून ज्यावेळी सचिव खानेकर हे आटमुर्डी गट ग्रामपंचायत मधे दिनांक ३१/७/२०२१ ला सकाळी ११.०० वाजता आले होते त्यावेळी गावातील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी केवळ तीन ग्रामपंचायत सदस्य होते आणि बाकी सरपंच उपसरपंच आणि दोन सत्ताधारी सदस्य हे अनुपस्थितीत होते.

दरम्यान सरपंच उपसरपंच यांनी सचिव खानेकर यांना ३१/७/२०२१ ला दुपारी १२.१५ वाजता शिवीगाळ व मारहाण करून मासिक नोंदवही फाडली अशी तक्रार वरोरा पोलीस स्टेशन मधे आहे ती पूर्णतः निराधार व बनावट तथ्यावर आधारित असून ज्याअर्थी सरपंच उपसरपंच यांनी दिनांक ३१/७/२०२१ला आयोजित सभेवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे ते ग्रामपंचायत सभागृहात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सचिव यांच्या तक्रारीत नमूद १२.१५ वाजता सरपंच उपसरपंच कुठे होते?

आटमुर्डी गट ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच हे नेमके कुठे होते त्याचा शोध लावला असता ते दोघे ज्यावेळी सचिव खानेकर यांनी म्हटल्या प्रमाणे दुपारी १२.१५ वाजता त्यांना शिवीगाळ मारहाण व मासिक नोंदवही फाडली असा आरोप करताहेत नेमके त्यावेळी सरपंच विठ्ठल जोगी हे ११.३५ वाजता शिवा राजूजी वराडकर यांच्यासोबत आनंदवन जवळील देशपांडे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते त्यानंतर ते दोघे वरोरा शहरातील डी मार्ट बेकरी मधे जवळपास ११.५० ला पोहचले त्यानंतर ते परत गावाला येताना बालाजी जिनिंग मौजा येंसा जवळ एका कार चा अपघात झाल्याने त्या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता हजर होते. त्यानंतर ते दोघे टेमुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ दुपारी १२.३५ च्या दरम्यान गेले व नंतर उपसरपंच जयदेव लभाने यांना घेऊन आटमुर्डी ला तिघेही गेले त्यावेळी दुपारचे १२.४५ वाजले होते. आता उपसरपंच जयदेव लभाने नेमके कुठे होते त्याची माहिती अशी आहे की दिनांक ३१/७/२०२१ ला होणार असलेली ग्रामपंचायत ची मासिक सभा व त्या सभेदरम्यान गावकरी यांचा सचिव खानेकर यांच्या विरोधात असलेला आक्रोश बघता व सरपंच उपसरपंच यांना सचिव खानेकर यांच्या कडून संभावित जीवे मारण्याचा प्रयत्न होण्याची भीती लक्षात घेता वरोरा पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात ऑनलाईन तक्रार करण्यासाठी टेमुर्डा येथील अभय इंटरनेट कैफे येथे टाईप करून लेटरपैडवर प्रिंट केली व उपसरपंच यांनी स्वाक्षरी करून ती तक्रार दुपारी १२.०१ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना मेल केला तर वरोरा पोलीस स्टेशन कार्यालयात दुपारी १२.०३ वाजता मेल केला. व त्यानंतर ते सरपंच विठ्ठल जोगी व शिवा वराडकर यांच्या सोबत आटमुर्डी गावाकडे निघाले त्यावेळी गावाला जाताना दुपारचे १२.४५ वाजले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश चवरे यांनी हाकलल्या उंटावरून शेळ्या?

आटमुर्डी गट ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मधे ज्या पद्धतीने तक्रार केली ती पूर्णतः बनावट टथ्थ्यावर आधारित असून ती खोटी आहे व विनाकारण सरपंच उपसरपंच यांना खोट्या गुन्ह्यात अडकण्याचा प्रयत्न सचिव खानेकर करीत आहे असा गावकऱ्यांचा आरोप आहे. मात्र आटमुर्डी गट ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर ३५३,३३२ सारखे गंभीर गुन्हे दाखल करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांनी नेमकी काय चौकशी केली हा संशोधनाचा विषय असून बनावट तथ्यावर ज्या प्रकारे सरपंच उपसरपंच यांच्यावर गंभीर गुन्हे चवरे यांनी दाखल केले ते उंटावरून शेळ्या हाकलण्यासरखे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here