Home ब्रम्हपुरी ब्रम्हपूरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जेसानी परिवाराच्या कुटुंबिया कडून सुनेचा छळ.

ब्रम्हपूरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जेसानी परिवाराच्या कुटुंबिया कडून सुनेचा छळ.

 

 व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इकबाल जेसानी यांच्या कौटुंबिक वाद चव्हाट्यावर. ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला कौटुंबिक हिंसाचार व हुंडा प्रतिबंधक कायदा अर्तगंत गुन्हा दाखल…..

ब्रम्हपूरी प्रतिनिधी :-

ब्रम्हपूरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जेसानी कुटुंबातील वाद आता कायद्याच्या चौकटीत आलेला असुन शाकीर गुलास अब्बास जेसानी यांचा ब्रम्हपूरी शहरात सुपर बाजार या नावाने किराणा दुकान असुन यांचा मुलगा मंजर शाकीर अली जेसानी यांच्या मुलाचा विवाह मुळचे चिमुर येथील प्रतिष्ठित व्यापारी सलिम युसफ अजानी यांची मुलगी नगमा हिच्याशी रितीरिवाजा प्रमाणे विवाह १५ नोव्हेंबर २०११ ला ब्रम्हपूरी येथे पार पडला. परंतु लग्नाच्या एक वर्षानंतर मंजर व त्याच्या आई-वडिलांचे वर्तण नगमा सोबत छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाद होऊ लागले. नगमा ला दोन मुले असून मोठा मुलगा अर्मान आणि लहान मुलगा अलीना असुन नगमा च्या वडिलांनी रितीरिवाजा प्रमाणे सोने व इतर समान दिले.पण पती मंजर जेसानी नेहमी मला पैस्याची अडचण आहे असे म्हणायचे .तु आपल्या माहेर वरून पैसे आण्यासाठी तागदा लावायचा .माझा संसार उद्धवस्त होऊ नये म्हणून आता पर्यंत वडिलां कडुन तीन लाख रुपये मागितले.पण अजुनही माझे पती मंजर जेसानी यांनी परत केले नाही. मार्च २०२१ महिन्यात माझ्या सांसर कडील लोकांना कोराना झाल्याने पती मंजर जेसानी यांनी पत्नी नगमा व मुलांना नागपूर येथे आई-वडिला कडे जाऊन राहा असे सांगितले.व मला दिनांक २८ मार्च २०२१ ला दिलसार जेसानी यांच्या सोबत आई-वडिलांकडे नागपूर येथे सोडून दिले.आणि मी जेव्हा तुला आणायला येईन तेव्हाच ब्रम्हपूरी ला येशील अशी ताकद दीली व निघून गेले.पती मंजर जेसानी यांनी मला मार्च महिन्यापासून दिनांक १९ जुन २०२१ पर्यंत फक्त दोन-तिन वेळा भेटायला आले.आणि प्रत्येक भेटीत पैस्याबाबत तुझ्या वडिलांसोबत बोलन झालं काय अशी विचारणा करत असायचे आणि मी नाही म्हटले तर परत निघुन जायचे.मी माझ्या वडिलांना सांगितले की पती मंजर जेसानी यांना चाळीस लाख रुपयांची गरज आहे ‌.वडिलांनी माझ्याकडे ऐवढे मोठे पैसे नाहीत . असे सांगितले.१५ जुन ला पती मंजर जेसानी पुन्हा वडिलांच्या घरी भेटायला आले. मला विचारले पैस्याबाबत काही तुझ्या वडिलांसोबत बोलन झालं काय? मी सांगितले की माझे वडील ऐवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही. तसेच पती मंजर जेसानी रागात निघुन गेले व दुसऱ्या दिवशी माझे वडिल सलिम अजानी यांनी पती मंजर जेसानी यांना फोन करून माझ्या मुलीला नांदवायचे नसेल तर विवाह मध्ये दिलेले सोने ,समान परत करा .आम्ही आमच्या मुलीचे समान व कागदपत्रे ब्रम्हपूरी ला येऊन घेऊन जाऊ असे सांगितले.दिनांक १९ जुन ला माझे वडील सलिम अजानी,आई भाऊ, मी व माझे दोन मुले आत मध्ये गेले असता माझे चुलत सासरे ईमरान जेसानी,नंदन खुशबू फातिमा (जेसानी) व इतर नातेवाईक यांनी आम्हाला घरात जाऊ दिले नाही.आणि आम्हाला घरा बाहेर बसण्यासाठी सांगितले.आम्ही सर्व घराबाहेर थांबलो.पती मंजर जेसानी व चुलत सासरे ईमरान जेसानी हे बाहेर येऊन माझ्या वडिलांना चाळीस लाख रुपये आणले काय असे विचारू लागले. माझे वडील म्हनाले की कशाचे पैसे आमच्या कडे पैसे नाहीत.तुम्हाला मुलीला नांदवायचे नसेल तर आमचे सामान व कपडे आणि कागदपत्रे घेऊन जाऊ द्या.आणि विवाह मध्ये दिलेले सोने परत करा असे बोलताच पती,सासु सासरे,व दिर हुसेन अबास, आमच्या सोबत वाद घालुन माझ्या आई- वडीलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.आणि आमच्या घरातुन निघुन जा म्हनुन. हाकलुन लावले.सदर मारपीट मध्ये माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली असून माझ्या वडिलांना पाठीला तर आई मानेला दुखापत झाली आहे.यावरुन आम्ही ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला पती मंजर जेसानी,सासु सासरे,दिर ,चुलत सासरे, यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.पती मंजर जेसानी,सासु दिलशाद जेसानी,सासरे शाकीर जेसानी,चुलत सासरे ईमरान जेसानी,चुलत सासरे शाबीर जेसानी,मोठा सासरे इकबाल जेसानी, यांनी मला वडिलांकडून चाळीस लाख रुपये आण असे ताकदा लावला व पैसे नाही दिले म्हनुन माझ्या आई-वडिलांचा शारीरिक व मानसिक छळ केला असुन सदर प्रकरण कौटुंबिक हिंसाचार व हुंडा प्रतिबंधक कायदा अर्तगंत कलम,४९८A,३२३,३४,४ कलमा अर्तगंत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here