Home चंद्रपूर थरारक :- एका जोडप्याने केला मुलासमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार.

थरारक :- एका जोडप्याने केला मुलासमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार.

गुलाब दडमल यांच्या कपाळावर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात हत्त्या खून व खुनी हल्ले ही नित्याचीच बाब असून आज दिनांक 7 ऑगस्टला शामनगर परिसरात क्षुल्लक वादावरून एका गुलाब दडमल नामक 42 वर्षीय इसमास सुकुमार मंडल व निशा छोटू मंडल ह्या पती-पत्नीने कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याची थरारक घटना स्वताच्या मुलांसमोर घडल्याची बाब समोर आली आहे.

गुलाब दडमल असे जखमीचे नाव आहे तर आरोपी शामनगर परिसरात राहणारे 35 वर्षीय छोटू सुकुमार मंडल व निशा छोटू मंडल असे आहे. आज दुपारी 1 वाजेदरम्यान गुलाब दडमल हे घरी जात असताना आरोपी छोटू ने त्यांच्या जातीचा उल्लेख करीत आवाज देत त्यांची कॉलर पकडली, यावर दडमल यांनी मला असं बोलू नको माझ्या घरी पाहुणे आले आहे” असे म्हटल्यावर छोटू ची पत्नी निशा ने हातात दगड घेत दडमल यांच्या गालावर मारला, भांडणाचा आवाज ऐकताच नागरिकांनी व दडमल यांच्या मुलानी भांडण सोडवले व वडिलांना घरी घेऊन जाऊ लागला मात्र आरोपी छोटू याने हातात कुऱ्हाड घेत दडमल यांच्या कपाळावर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला.

अचानक झालेल्या कुऱ्हाडीच्या प्रहाराने दडमल हे रक्तबंबाळ झाले, त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाची रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली, आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Previous articleब्रम्हपूरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जेसानी परिवाराच्या कुटुंबिया कडून सुनेचा छळ.
Next articleआमदार जोरगेवार चे चार एक्के तर भाजपचे घंटानाद आंदोलन कशासाठी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here