Home चंद्रपूर आमदार जोरगेवार चे चार एक्के तर भाजपचे घंटानाद आंदोलन कशासाठी?

आमदार जोरगेवार चे चार एक्के तर भाजपचे घंटानाद आंदोलन कशासाठी?

२०० युनिट वीज बीलाचा मुद्दा गेला कुठे? स्वताच्या हितासाठी जनतेची पायपीट?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात दिनांक ९ ऑगस्ट च्या क्रांती दिनी भाजप आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे आंदोलन प्रतिआंदोलन झाले ते आपसी संघर्षाची नांदी आहे असं म्हणाव लागेल कारण त्या आंदोलनात जे शहरातील नागरिक सहभागी झाले होते त्यांच्या हिताचा प्रश्न या आंदोलनात नव्हता तर नुसती स्टंटबाजी होती. अगोदर भाजप चे घंटानाद आंदोलन झाले तर नंतर किशोर जोरगेवार यांचे चार एक्के दे धक्के असे आंदोलन झाले ते पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शांततेत पार पडले पण आंदोलनाचे फलित काय? असा प्रश्न चंद्रपूर शहरातील जनतेला पडला आहे. कारण हे आंदोलन म्हणजे स्वताच्या हितासाठी जनतेची पायपीट करण्यासारखे आहे.

खरं तर आमदार किशोर जोरगेवार यांना नेमक करायचं काय आहे? हेच मुळात कळत नाही. कारण २०० युनिट मोफत मिळणार ही थाप देऊन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला भुरळ पाडली आणि जवळपास ७२ हजार पेक्षा जास्त मतदान घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात इतिहास घडविला त्या आमदार किशोर जोरगेवार यांना राजकीय समजआहे का? याबद्दल संभ्रम आहे. कारण निवडून आल्या आल्या त्यांनी भाजपची सत्ता बसणार हे ग्रुहीत धरून सरळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला बिनशर्त पाठिंबा दिला मात्र नंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षांशी फारकत घेऊन जेव्हां काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले तेंव्हा किशोर जोरगेवार यांनी यू टर्न घेऊन महा विकास आघाडी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला वाटलं होत की जिकडे सत्ता आहे तिथे जोरगेवार यांनी समर्थन यासाठी दिले असेल की २०० युनिट वीज बीलाचा मुद्दा सरकार च्या माध्यमातून सोडवला जाईल.

पण सत्ता मिळाल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी जनतेच्या कळीच्या मुद्द्याला ऐरणीवर टाकून जिल्ह्यात दारू येते कशी? हा विषय घेतला नंतर दारूबंदी उठली तर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेंच्या विविध कामातील घोटाळा व महापौर यांच्या ११११ गाडी नंबर च्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली.कुठलाही लोकप्रतिनिधी हा जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी कटिबद्ध असायला हवा पण चंद्रपूर जिल्ह्यातील इलेक्ट्रिक लाईट बिल एवढ्या मोठ्या वाढले असताना व वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनी बिल भरले नाही म्हणून तोडत असताना किशोर जोरगेवार यांच्या तोंडून याबद्दल एक शब्द सुद्धा निघत नसेल तर मग किशोर जोरगेवार यांना जनतेने काय फक्त महानगरपालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचार उघट करण्यासाठी व दारू रेती चे मुद्दे उचलण्यासाठी आमदार केले का? हा प्रश्न अत्यंत गंभीर विषय असून २०० युनिट वीज बिल माफीचा मुद्दा किशोर जोरगेवार यांच्या गळ्याची हड्डी बनला आहे.

२०० युनिट वीज बीलाचा मुद्द्यावर आंदोलन का नाही?

भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षातील नेत्यांना महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचा प्रश्न गंभीर वाटत नाही आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने ज्या किशोर जोरगेवार यांना या मुद्द्याला घेऊन आमदार बनवले ते किशोर जोरगेवार सुद्धा विसरले मग वीज ग्राहकांनी कुणाकडे जायचे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. आता २०० युनिट वीज बिलाचा प्रश्न ऐरनीवर गेला असला तरी वीज बीलात झालेली मोठी वाढ यासाठी कुणी आंदोलन करणार का? असा प्रश्न चंद्रपूर शहरातील जनतेकडून विचारला जात आहे. एरव्ही जिल्ह्यातील रेती घाटातून आलेली रेती आमदार किशोर जोरगेवार स्वता विकत घेतात कारण त्यांना अधिक्रुत रेतीची टीपी मिळाली आहे असे त्यांनी स्वता सांगितले तर मग किशोर जोरगेवार यांचे निवडून आल्यानंतर केवळ पैसा कमावणे हेच लक्ष आहे का? असाही प्रश्न जनतेला पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here