Home चंद्रपूर सनसनीखेज :- चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक व नातेवाइकांवर गुन्हे...

सनसनीखेज :- चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक व नातेवाइकांवर गुन्हे दाखल

 

बँकेची लूट करणा-यांची गय केल्या जाणार नाही बैँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचा धमाका.

चंद्रपुर प्रतिनिधी :-

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपत्तीची जवाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच एका संचालकाने बँकेच्या योजनेत घोळ करुन कर्ज रक्कम उचल केली. याबाबत माहिती होताच याची  दक्षता घेवुन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी त्या संचालकाविरोधात प्रशासकिय विभागातर्फे कारवाई केली. व बँकेची लूट करणा-यांची गय केल्या जाणार नाही असे यावेळी ठणकावून सांगितले.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सोने तारण गहाण योजना राबविल्या जाते. या योजनेत बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी या योजनेत कमी सोने ठेवून जास्त सोने असल्याचे दाखवून जास्त कर्जाची उचल केली. याविरोधात आज (दि.९) ला बँकेच्या प्रशासकिय विभागाने नागभीड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मारोती पोटे या बैंक अधिकारी यांनी अर्जदार म्हणून  तक्रार केली असून या प्रकरणात गैर अर्जदार म्हणून बैँकेचे संचालक गजानन पाथोडे कर्ज क्र. 471,472, ओमप्रकाश पाथोडे कर्ज क्र. 456, पुष्पदेव ऋषी पाथोडे कर्ज क्र. 478,479 यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

यांनी कर्जखात्यावर सोन गहाण ठेवून कर्ज उचलले. सदर कर्ज हे सोन्याचे मूल्यमापन प्रदिप नांदगुरवार यांनी प्रो.प्रा. पायल ज्वेलर्स, नागभीड यांनी वरील अर्जदार यांचेशी संगणमत करुन कमी सोन तारण ठेवून त्याचे वजन जास्त प्रमाणात दाखवून कर्ज उचल केली व बैंकेची फसवनुक केली. सदर प्रकरण बैंकेच्या संचालक मंडळानी आरबीआयच्या निर्णयानुसार नेमनुक केलेल्या लेखा परीक्षणानुसार तपासणी केली असता, बैंकेचे संचालक गजानन पाथोडे व त्यांचे नातेवाइक यांनी बैंकेची फसवणूक केली हे स्पस्ठ झाले. हे बैंकेचे दवा व असोसिएट आणी चार्टर्ट अकाउंटट यांनी बैकेला कळविले, त्यावर बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत व संचालक मंडळ यांनी बैंकचा हिताचा निर्णय घेवून गैरअर्जदार यांचेवर गुन्हा दाखल केले. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बैंक ही अत्यंत वाईट परीस्थिती असतांना, संतोष सिंह रावत यांनी बैंकचा एनपीए 29% वरुन 31 मार्च 2021 रोजी 13.87% वर आणला. व बैंकचा 21/03/2021 ला बैंकेला 60 कोटी 25 लाख 29 हजार नफा मिळवून दिला, व सर्व तरतूद जाता बैंकचा निव्वड नफा 3 कोटी 39 लाख 69 हजार रु. आहे. हे सर्व करीत असतांना बैंकेचे हित जोपासता संचालक व नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला. व शेतक-याच्या बैंकचे हित जोलासले. भारतीय दंड संहिता 1960 अन्वये 420, 465, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. सदर केलेल्या कारवाइला दणाणून गैरअर्जदाराने बैंकेची सदर रक्कम खात्यात जमा केली. सर्वकडे बैंके अध्यक्ष व संचालक मंडळाचे केलेल्या कारवाई नुसार अभिनंदन सुरु आहे. व बैंक सुरक्षित आहे, असे सिध्द झाले, याबाबत अध्यक्ष यांनी कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here